Monday, June 17, 2024

बापरे बाप! अभिनेत्री श्रिया सरनने दिवाळी पार्टीतच पतीला केलं किस, व्हिडिओ तुफान व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये दिवाळीपार्टीचं आयोजन केलं जात आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी दिवाळी पार्ट्यांचं आयोजन केले आहेत. क्रिती सेनन, एकता कपूरपासून ते मनीष मल्होत्रापर्यंत अनेक सेलेब्रेटींनी आपल्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं. यामध्ये बॉलिवूडपासून ते साऊथपर्यंत सर्व कलाकारांनी हजेरी लावत आहेत. बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री श्रिया सरन(Shriya Saran) हिने अलीकडेच पती आंद्रेई कोशेव्हसोबत कृष्ण कुमारच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. याआधीही ते दोघेही तापसी पन्नूच्या दिवाळी पार्टीत दिसली होती. आता अभिनेत्री आणि तिच्या पतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

श्रियाचा लिपलॉक व्हिडिओ व्हायरल
खरं तर, श्रिया सरन तिच्या पतीसोबत दिवाळीच्या कोणतीही पार्टीला जात आहेत तिथं सर्वांच्या नजरा त्याकडेच असतात. याचं कारण त्याच्या लूक नव्हे तर लिपलॉक आहे. जेव्हा हे दोघेही कॅमेऱ्यासमोर एकमेकांना किस करत आहेत. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती गुलाबी रंगाच्या लेहेंगामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. त्याचवेळी तिचा नवरा सूट-बूटमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये, दोघेही मीडियासाठी पोझ देण्यासाठी पोहोचतात, जेव्हा तिचा पती तिच्या कानात काहीतरी बोलतो, ज्यावर ती खूप आनंदी होते आणि त्यानंतर दोघेही लिपलॉक करताना दिसतात. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आता अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरही शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

अशा प्रतिक्रिया युजर्सनी दिल्या
एकीकडे चाहते दोघांच्या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तर दुसरीकडे काही यूजर्स प्रश्नही उपस्थित करत आहेत, एका युजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, एकाने लिहलंय, ‘हे सर्व सार्वजनिक ठिकाणी करणं गरजेचं आहे का?’ याशिवाय आणखी एकाने लिहिले, ‘हो, खरंच असं का होतं?’ तर तिसर्‍याने लिहिले की, ‘पुन्हा सुरू झाली, ही दिवाळी आहे, रिसेप्शन पार्टी नाही’. तर एकाने लिहिले ‘पुन्हा नाटक सुरु झालं’.

श्रिया सरनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती लवकरच अजय देवगणसोबत ‘दृश्यम 2’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याचा फर्स्ट लुक आणि ट्रेलर व्हिडिओही रिलीज झाला आहे. यासोबतच अभिनेत्रीकडे दाक्षिणात्य चित्रपट देखील आहेत, ज्यामध्ये ती महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

दिवाळी म्हटल्यावर कार्तिक आर्यन बघत असतो ‘या’ खास क्षणाची वाट, बालपणीच्या दिवसांचा केला खुलासा
सार्वजनिक ठिकाणी ‘या’ कलाकारांची सटकली, एकाने तर डायरेक्ट नाकचं फोडलं

हे देखील वाचा