Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड श्रिया सरनने उघड केले तिचे गोड गुपित, नऊ महिन्यांपूर्वी त्यांच्या आयुष्यात आली एक गोड ‘परी’

श्रिया सरनने उघड केले तिचे गोड गुपित, नऊ महिन्यांपूर्वी त्यांच्या आयुष्यात आली एक गोड ‘परी’

दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री असणाऱ्या श्रिया सरनने नुकतेच तिचे एक गोड गुपित उघड केले आहे. श्रियाने अजय देवगण सोबत ‘दृष्यम’ या चित्रपटात काम केले होते. तिने आता एक आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे. श्रिया एका वर्षाआधीच आई झाली आहे. श्रियाने याबद्दलचा एक गोंडस व्हिडिओ फॅन्ससोबत शेअर केला आहे. श्रियाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ अपलोड केला आहे. श्रियाच्या प्रेग्नेंसीच्या अफवा खूप दिवसापासून पसरत होत्या. आता या अफवांवर स्वतः श्रियाने पूर्णविराम लावला आहे. श्रिया सरनने एक गोंडस व्हिडिओ शेअर करत तिने त्यामागचे रहस्य उघड केले. २०२० मध्ये ती आई झाले आणि त्याची महिती तिने आता सोशल मीडियावरून दिली आहे.

श्रिया सरनने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये ती तिच्या मुलीसोबत राधासोबत आणि नवऱ्यासोबत आनंदाचे क्षण घालवताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, “हॅलो मित्रांनो, २०२० मध्ये आमचे क्वारंटाइनचे दिवस खूप सुंदर होते. तसेच जेव्हा संपूर्ण जग कोरोनाच्या संकटात अडकले होते, तेव्हा आमचे जग कायमचे बदले. आमचे जीवन साहस, उत्साह आणि शिकण्याने भरलेले होते. या दरम्यान, आमच्या घरी एक गोड परी आली. माझी मुलगी राधा नऊ महिन्यांची झाली आहे. आता मी तिला जास्त लपवू शकत नाही. त्यामुळे आम्ही देवाचे खूप आभारी आहोत.”

श्रियाने २०१८ मध्ये राजस्थानमध्ये बॉयफ्रेंड एंन्ड्रीसोबत लग्न केले. मालदीवमध्ये दोघांची पहिली भेट झाली. लग्नानंतर, सर्वत्र श्रियाच्या प्रेग्नेंसीबद्दल खूप अफवा पसरल्या होत्या. श्रिया आपल्या पतीसोबत बार्सिलोना, स्पेनमध्ये राहत होती, परंतु २०२० मध्ये ती भारतात परतली. आता श्रिया आपल्या पतीसोबत मुंबईत आहे आणि आई झाल्यानंतर तिचा आनंद सातव्या आसमंतात पोहोचला आहे.

श्रिया साऊथ इंडस्ट्रीची मोठी, प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आपल्या करियरची सुरुवात २००१ पासून केली. श्रियाची पहिला सिनेमा ‘तुझे मेरी कसम’, ज्यात जेनेलिया आणि रितेश देशमुख हे कलाकार होते. त्यानंतर २००७ साली इमरान हाशमी सोबत ती ‘आवारापन’ चित्रपटात दिसली. तिने अनेक टॉलीवूड चित्रपटात काम केले आहे .तिचा बॉलीवूडमधला ‘दृष्यम’ हा सुपरहिट चित्रपट आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मायशा- ईशानच्या नात्याबद्दल उमरने केली ‘अशी’ कमेंट, सोशल मीडियावर चाहते बांधतायेत कौतुकाचे पूल

-कर्जात बुडालेल्या अमिताभ बच्चन यांचे तारणहार ठरले ‘यश चोप्रा’ आणि ‘केबीसी’

-सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर, कायमची मुंबई सोडणार शेहनाझ गिल? चाहते पडले चिंतेत

हे देखील वाचा