Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिनेत्री श्रुती हसनच्या बॉयफ्रेंडने तिच्या पाठीवर बसून केली घोडेस्वारी, नेटकरी म्हणाले…

दाक्षिणात्य आणि बॉलीवूड अभिनेत्री श्रुती हसन तिचा प्रियकर शांतनू हजारिका मुळे सध्या बरीच चर्चेत असते. दोघेही सोशल मीडियावर सतत एक्टिव असतात. दोघेही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. नुकताच श्रुतीने तिच्या अधिकृत अकाऊंटवरुन या दोघांचा एक वर्कआऊट व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या विविध प्रक्रिया येत आहे.

श्रुतीने पोस्ट केलेल्या या व्हिडीओओमध्ये ती आणि शांतनू व्यायाम करताना दिसत आहेत. अचानक दोघेही दम लागल्यामुळे विश्रांतीसाठी थांबतात तेव्हा शांतनू श्रुतीच्या पाठीवर बसून घोडेस्वारी करू लागतो आणि मधूनच दोघेही ओरडतात. एवढ्यावर न थांबता शांतनू घोड्याला जसे मारतात तसे श्रुतीला फटके देत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. श्रुतीच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी खूप मजा घेतली. हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाख ६८ हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओला पोस्ट करत श्रुतीने लिहिले, “आम्ही व्यायामाला गांभीर्याने घेतो.”

अनेक चाहत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे, तर अनेकांनी ह्या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. या व्हिडिओवर ‘ही घोडेस्वारी मला आवडली’, अस एका नेटकाऱ्याने लिहले आहे, तर दुसर्‍याने ‘मला सुद्धा घोडेस्वारी खुप आवडते’ असे नमूद केले आहे. ‘अशा प्रकारची घोडेस्वारी मला ही करायची आहे’ असे अजून एकाने लिहिले.

दरम्यान वयाच्या चौथ्या वर्षीच बालकलाकार म्हणून श्रुतीने कला क्षेत्रात पाऊल ठेवले होते. श्रुतीने तामिळ आणि तेलुगूसह अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्यामुळेच तिचे दक्षिण भारत आणि उत्तर भारतात सुद्धा अनेक चाहते आहेत. इंस्टाग्रामवर सुद्धा तिचे असंख्य चाहते आहेत. श्रुती अभिनयाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ही बरीच चर्चेत असते. श्रुती लवकरच प्रभास सोबत ‘सालार’ चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आर्यन खानला देण्यात आलीत विज्ञानाची पुस्तके, इतर आरोपींप्रमाणे त्यालाही मिळतंय नॅशनल हिंदू रेस्टॉरंटमधील जेवण

-‘ते तर या पार्टीमध्ये जाण्यास तयार देखील नव्हते…’, आर्यनचा मित्र अरबाज मर्चंटच्या वडिलांनी सोडले मौन

-शर्लिन चोप्राचा शाहरुख खानवर गंभीर आरोप; म्हणाली, ‘त्याच्या पार्टीत लोक पांढऱ्या पावडरचे सेवन…’

हे देखील वाचा