Saturday, June 29, 2024

श्रुती हासनने खुल्लमखुल्ला व्यक्त केलं प्रेम, कॅमेऱ्यासमोर बॉयफ्रेडला किस करताना दिसली अभिनेत्री

श्रुती हासन (Shruti Haasan) ही अशीच एक अभिनेत्री आहे, जी तिच्या चाहत्यांपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवत नाही. वैयक्तिकपासून व्यावसायिकपर्यंत सर्व प्रकारच्या गोष्टी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या श्रुतीने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून, या व्हिडिओमध्ये ती तिच्या बॉयफ्रेंडवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. 

स्वत:ला म्हणाली, ‘चिपकू’
श्रुती हासन दररोज बॉयफ्रेंड शंतनू हजारिकासोबत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. पुन्हा एकदा ती एका पोस्टद्वारे तिचे प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. अलीकडेच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती स्वत:ला चिपकू म्हणत आहे. प्रेमळ आणि रोमँटिक व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले की, “तुझ्याकडे माझे हृदय आहे, चिपकूकडून खूप प्रेम.” (shruti haasan is crazy for her boyfriend shantanu hazarika shared romantic video)

‘आमचे विचार जुळतात’
श्रुती हासनने अलीकडेच तिच्या एका मुलाखतीत शंतुनसोबतच्या नात्याबाबत काही गोष्टी सांगितल्या होत्या. ती म्हणाली होती की, “शंतनू माझा चांगला मित्र आहे. तो एक अतिशय प्रतिभावान कलाकार आहे. कला, संगीत, सिनेमा अशा अनेक पैलूंमध्ये आमची विचारसरणी एकत्र येते. त्यामुळे मला त्याच्यासोबत वेळ घालवायला आवडते. मला त्याच्याबद्दल खूप आदरही आहे. मात्र, लग्नाबाबत मी सांगेन की, सध्या तरी आमचे असे कोणतेही नियोजन नाही.”

एकत्र राहतात दोघे
श्रुती आणि शंतनू एकत्र राहत आहेत. शंतनू म्हणाला की, ते खूप चांगले मित्र आहेत आणि एकत्र खूप मजा करतात. शंतनू पुढे म्हणाला की, त्यांच्याबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, ते एकाच खोलीत तासनतास राहू शकतात आणि चिडचिड, अस्वस्थ किंवा कदाचित अस्वस्थ वाटण्याऐवजी ते कम्फर्ट झोनमध्ये राहू शकतात. शंतनूला विश्वास आहे की, हे शक्य आहे. कारण त्यांचे नाते मैत्रीवर आधारित आहे आणि ते चांगले मित्र आहेत.

श्रुती हासनचे वर्कफ्रंट
श्रुती हासनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती साऊथचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘सालार’मध्ये दिसणार आहे. प्रशांत नील दिग्दर्शित या ऍक्शन थ्रिलर चित्रपटात श्रुती ‘बाहुबली’ सुपरस्टार प्रभाससोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट दोन भागात बनवण्याची तयारी सुरू आहे. प्रभास आणि श्रुतीचा हा चित्रपट १४ एप्रिल २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा