Thursday, April 25, 2024

शेतकऱ्यांचा मालाला योग्य भाव मिळत नसल्याविरुद्ध आवाज उठवणार ‘ही’ अभिनेत्री, आपल्या पुढच्या चित्रपटात मांडणार हा विषय

साऊथ आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हसन तिच्या चित्रपट क्षेत्रातील ब्रेक नंतर आता पुन्हा नव्याने चित्रपटात पुनरागमन करणार आहे. ‘रवी तेजा’ यांच्या ‘क्रैक’ चित्रपटातून श्रुतीने आपला जलवा प्रेक्षकांना दाखवला आहे. तसेच तिच्या मनमोहक अदांनी तर प्रेक्षकांवर भुरळच पडली आहे. आजकाल श्रुती तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूपच व्यस्त आहे.

याआधी तिने ‘विजय सेतुपटी’ याच्या ‘लाबम’ आणि ‘पवन कल्याण’ यांच्या ‘वकील साब’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे आणि सध्या ती पॅन इंडिया स्टार प्रभासच्या ‘सालार’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. गेल्या काही दिवसांपासून मॅगझिनच्या कव्हर पेजवर श्रुतीचे फोटो येत आहेत. यामुळे तिच्या प्रसिद्धीमध्ये बरीच भर पडली आहे.

नुकतेच श्रुतीने एका न्यूज पोर्टलच्या इंटरव्ह्यूमध्ये आपल्या आगामी चित्रपटाबद्दल सांगितले आहे. तसेच तिने असे सांगितले आहे की, तिचे चित्रपट सामाजिक संदेश देणार आहेत. तिचा ‘लाबम’ हा चित्रपटात शेतकऱ्यांवर आधारित आहे. चित्रपटात शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना कोणत्या समस्या तोंड द्यावे लागते याबद्दल सांगितले आहे. तसेच वकील साब हा चित्रपटात महिलांसोबत होणारे गैरव्यवहार, त्यांना दिली जाणारी हीन वागणूक याबद्दल दाखवले आहे.

श्रुतीचा वकील साब हा चित्रपटात अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांच्या पिंक या चित्रपटाचा रिमेक आहे. श्रुतीने या चित्रपटाबद्दल माहिती देताना सांगितले आहे की, वकील साब सारखे चित्रपट बनवणे ही काळाची गरज आहे. आणि जर चित्रपटात पवन कल्याण सारखे अभिनेते असतील तर तुम्हाला हा चित्रपट प्रेक्षकांशी‌ जोडायला जास्त वेळ नाही लागणार. जो कोणीही आपल्या विचाराणे समाजातील विचार बदलतात ते खूपच मदतगार असतात.” पिंक या चित्रपटाचा तमिळ रिमेक तयार होत आहे, ज्याचं नाव ‘नेरकोंडा परवाई’ असं आहे.

हे देखील वाचा