मराठी, हिंदी तसेच तामिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी श्रृती मराठे शनिवारी (९ ऑक्टोबर) तिचा वाढदिवस साजरा करते. ‘राधा ही बावरी’ या मालिकेमधून घराघरात पोहोचलेल्या श्रृतीचा जन्म ९ ऑक्टोबर १९८६ रोजी बडोदा येथे झाला. त्यानंतर तिचे संपूर्ण कुटुंब पुण्यामध्ये स्थायिक झाले.
श्रृतीने पुण्यातील सेंट मीरा या शाळेतून प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवले. लहानपणापासूनच तिला अभिनयाची खूप आवड होती. त्यामुळे शाळेतील प्रत्येक समारंभात आणि स्पर्धेमध्ये ती सहभाग घ्यायची. (Shruti marathe Birthday special awesome facts about actors life)
१०वी पासचे बक्षीस आणि मिळाला चित्रपट
इयत्ता १० वीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर, तिला लगेचच अभिनयाची एक संधी मिळाली. ‘पेशवाई’ या मालिकेमध्ये ती साल २००३ मध्ये झळकली. श्वेता तळवळकर या मालिकेच्या दिग्दर्शिका होत्या.
त्यानंतर आपली अभिनयाची आवड जोपासत तिने महाविद्यालयीन शिक्षणाला सुरुवात केली. त्यावेळी प्रथमच तिला एक जाहिरात मिळाली. ‘पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स’ ही तिची पहिली जाहिरात होती. यानंतर तिने पुढील वाटचालीसाठी मुंबई गाठायचे ठरवले.
मुंबईमध्ये आल्यानंतर तिला साल २००८ मध्ये ‘सनई चौघडे’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. साल २००९ मध्ये प्रथमच तिला एक तामिळ चित्रपट मिळाला. या चित्रपटाचे नाव होते ‘इंदिरा व्हिजा’.
खोटं नाव लाऊन फिरत होती
अभिनेत्रीने सुरुवातीला तामिळ चित्रपट चांगलेच गाजवले. एकापाठोपाठ एक तामिळ चित्रपट तिच्या पारड्यात पडू लागले होते. त्या काळी तिने स्वतःचे नाव हेमा मालिनी असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सुरुवातील तिला अनेक जण हेमा मालिनी म्हणूनच ओळखत होते. परंतु कालांतराने तिने तिचे हे नाव बदलले आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ती श्रृती प्रकाश या नावाने ओळखली जाऊ लागली.
त्यांनतर तिने मराठी सिनेसृष्टीमध्ये देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिने मराठी तसेच हिंदी आणि तामिळमधील ‘लागली पैज’, ‘राम माधव’, ‘असा मी तसा मी’, ‘गुरु शिष्यन’, ‘अर्वान’, ‘तुझी माझी लव स्टोरी’, ‘अडू आता अडू’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
मोठा पडद्यासह तिने छोटा पडदा देखील चांगलाच गाजवला. ‘राधा ही बावरी’ या मालिकेतील तिच्या भूमिकेने सर्वांना वेड लावले होते. तिने हिंदीमधील ‘रुद्रकाल’, ‘बर्ड ऑफ ब्लड’ या मालिकांमध्ये देखील अभिनय केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हिना खानचा ब्रेकअप? अभिनेत्रीच्या लेटेस्ट पोस्टमुळे चाहते पडले चिंतेत
-आर्यन खानला सकाळी ७ वाजता मिळणार जेलमधील जेवण, ‘या’ गोष्टीसाठी तरसणार शाहरुखचा मुलगा
-‘हे नक्की शाल्विताच का?’ ओम अन् स्वीटूच्या ‘त्या’ व्हिडिओवर रंगल्यात चाहत्यांच्या चर्चा