कलाकारांसाठी फोटोशूट करणे म्हणजे अगदी सामान्य बाब आहे. फोटोशूट म्हणजे कलाकारांसाठी एक प्रकारची पब्लिसिटीचं असते. विविध वेशभूषा, विविध मेकअप करत वेगवेगळे फोटोशूट करणे प्रत्येक कलाकाराचे कामच आहे. बॉलिवूडपासून ते अगदी मराठी इंडस्ट्रीपर्यंत सर्वच कलाकार फोटोशूटच्या बाबतीत मागे नाही. अशीच मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे. श्रुती नेहमीच तिचे विविध प्रकरचे फोटोशूट करत चर्चेत येत असते.
श्रुतीचे वर्णन करायचे झाले तर अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर, अनोखा संगम म्हणजे श्रुती मराठे. मागील काही काळापासून मराठी चित्रपट आणि मालिकांपासून लांब असणारी श्रुती सोशल मीडियावर मात्र तुफान सक्रिय आहे. ती नेमी तिचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करताना दिसते. (shruti marathe wearing gown fairytale dress)
नुकतेच श्रुतीने तिच्या अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहे. श्रुतीच्या वेगवेगळ्या लूक्समधल्या फोटोंना सोशल मीडियावर फॅन्सकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. तसाच प्रतिसाद तिने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोना मिळाला आहे.
फिकट लव्हेंडर रंगाच्या फ्रॉक स्टाइल ड्रेसमध्ये श्रुती कमालीची सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. अतिशय साधा अंतर लक्षवेधी ठरणारा तिचा हा लूक खूपच भाव खाऊन जात आहे. अतिशय कमी आणि साधा मेकअप आणि अगदी कमी ज्वेलरी तिने या फोटोंमध्ये घातलेली असून, सोबतच तिने पोनीटेल बांधल्यामुळे ती अधिकच उठून दिसत आहे. हे फोटो पोस्ट करताना श्रुतीने लिहिले, “जिथे उठे जाल तिथे तुमची चमक सोडा.”
श्रुतीने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मने जिंकली आहेत. श्रुतीने मराठीसोबतच साऊथमध्ये देखील तिच्या अभिनयाची भुरळ सर्वांना घातली. तमिळ सिनेमा ‘इंदिरा विजहा’ने मधून तिने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. साउथमध्ये ती ‘श्रुती प्रकाश’ या नावाने प्रसिद्ध आहे.
श्रुती मराठेने ‘सनई-चौघडे’ या चित्रपटातून मराठीमध्ये पदार्पण केले. तिची या चित्रपटातील छोटीशी मात्र दखल घेण्याजोगी भूमिका होती. त्यानंतर ती अनेक मराठी चित्रपटात दिसली. तिला खरी ओळख मिळाली ती टीव्हीवरील ‘राधा ही बावरी’ या मालिकेने. त्यानंतर ती ‘जागो मोहन प्यारे’ या मालिकेतही दिसली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बिग बॉस’च्या घराबाहेर राखी सावंतला चावला कुत्रा; म्हणाली, ‘मी पण त्याला चावणार’
-‘पोन्नियन सेलवन’ सिनेमातील ऐश्वर्याचा फोटो लीक; अभिनेत्री दिसली ‘या’ अवतारात