मराठी मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्री सध्या जोरदार चर्चेत आहेत. त्यांच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटनांमुळे, तर कधी सोशल मीडिया पोस्टमुळे त्या खूप चर्चेत असतात. अशातच सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे. श्रुती सोशल मीडियावर सातत्याने तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. श्रुतीने झी मराठीवरील ‘राधा ही बावरी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम केले आहे. इथूनच तिच्या प्रसिद्धीला सुरुवात झाली. या मालिकेने तिला महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात जागा निर्माण करून दिली. सध्या ती सोशल मीडिया पोस्टमुळे जोरदार चर्चेत आहे. तिचा एक फोटो चांगलाच चर्चेत आला आहे.
श्रुतीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने पांढऱ्या रंगाचा बलून स्लीव्ह टॉप आणि पांढरी स्कर्ट परिधान केली आहे. तसेच तिने कर्ली हेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोवर तिचे चाहते सातत्याने हार्ट आणि फायर ईमोजी पोस्ट करून तिचे कौतुक करत आहेत. तिचा हा फोटो पाहून तिच्याकडे पाहतच राहावं, असं वाटत आहे. (shruti marathe’s photo viral on social media)
याआधी देखील श्रुतीने अनेक फोटो शेअर केले आहेत. कधी पारंपरिक, तर कधी वेस्टर्न लूकमधील तिचे फोटो तिने शेअर केले आहेत. तिच्या चाहत्यांनी देखील या फोटोंना जोरदार प्रतिसाद दिला आहे.
श्रुतीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘तप्तपदी’, ‘प्रेमसूत्र’, ‘बंध नायलॉनचे’, ‘अरावण’, ‘शुभमंगल सावधान’, ‘इंदिरा विझा’ या चित्रपटात काम केले आहे. यासोबत श्रुती एक उत्तम डान्सर देखील आहे. तिने अनेक गाण्यांवर डान्स केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भारीच ना! ‘बबड्या’ अन् ‘शुभ्रा’ची जोडी ‘या’ प्रोजेक्टमधून पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
-सरिता माधवनने लिहिले, ‘बायको नेहमीच बरोबर असते’, यावर माधवन म्हणतो, ‘नक्कीच मात्र ….
-देखा हजारो दफा आपको! ऋतुजा बागवेचा साडीतील साधेपणा पाहून चाहत्यांची बत्ती गुल