Wednesday, January 14, 2026
Home टेलिव्हिजन जुनी अंगूरी भाभीची मुलगी पाहिलीत का? शुभांगी अत्रेची लाडकी आशी हिरोईनपेक्षा कमी नाही, फॅन्स म्हणाले – ‘फक्त 19-20 चा फरक

जुनी अंगूरी भाभीची मुलगी पाहिलीत का? शुभांगी अत्रेची लाडकी आशी हिरोईनपेक्षा कमी नाही, फॅन्स म्हणाले – ‘फक्त 19-20 चा फरक

टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘भाबीजी घर पर हैं’मधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री शुभांगी अत्रे यांनी अंगूरी भाभीच्या भूमिकेत तब्बल 10 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. शोचा पहिला सीझन संपल्यानंतर त्यांनी या मालिकेला अलविदा केला असून, आता त्यांच्या जागी पुन्हा एकदा शिल्पा शिंदे यांची एंट्री झाली आहे. यापूर्वीही शिल्पा यांनी अंगूरी भाभीची भूमिका साकारली होती, मात्र निर्मात्यांशी मतभेद झाल्याने त्यांनी शो सोडला होता.

शुभांगी अत्रे (Shubhangi Atre)जरी आता या मालिकेत दिसत नसल्या, तरी त्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. साडीतील साध्या-सोज्वळ अंगूरी भाभीपेक्षा रिअल लाइफमध्ये शुभांगी अतिशय ग्लॅमरस दिसतात. विशेष म्हणजे त्या ग्लॅमरच्या बाबतीत आपल्या लेकीलाही मागे टाकत असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

शुभांगी अत्रेंची 19 वर्षांची मुलगी आशी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. शुभांगी यांनी पियूष पूरे यांच्याशी विवाह केला होता आणि त्यांना आशी ही मुलगी आहे. गेल्या वर्षी शुभांगी आणि पियूष यांचा घटस्फोट झाला होता, तर त्यानंतर पियूष यांचे निधन झाले. सध्या आशी परदेशात शिक्षण घेत आहे.

आई-लेकीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यावर चाहत्यांकडून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी शुभांगी यांना ‘संतूर मम्मी’ असे संबोधले आहे, तर काहींच्या मते आई आणि मुलगी यांच्यात फक्त 19-20 वर्षांचाच फरक दिसतो. काही चाहत्यांनी तर आशीनेही अभिनय क्षेत्रात नशीब आजमावावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

दरम्यान, ‘भाबीजी घर पर हैं’च्या सीझन 2 मधून बाहेर पडण्याबाबत शुभांगी अत्रे यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता. गेल्या सुमारे एक वर्षापासून निर्मात्यांशी याबाबत चर्चा सुरू होती, असे त्यांनी सांगितले. त्या या निर्णयाबाबत साशंक होत्या, मात्र मुलगी आशीनेच त्यांना पुढे जाण्यास आणि काहीतरी नवीन करण्यासाठी प्रेरणा दिल्याचे शुभांगी यांनी स्पष्ट केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

सुपरफ्लॉप डेब्यूनंतर स्टारकिडला दुसरी संधी, ब्लॉकबस्टर हिरोसह रोमँटिक भूमिकेत; नव्या चित्रपटाचा पोस्टर रिलीज

हे देखील वाचा