Wednesday, July 3, 2024

‘ट्रान्सजेंडर कलाकारांनाही बॉलिवूडमध्ये संधी मिळायला हवी’, शुभी शर्माने करण जोहरला केली विनंती

ट्रांसजेंडर अभिनेत्री शुभी शर्मा; ‘चांद जलने लगा’ मध्ये दिसते आहे. ज्यात विशाल आदित्य सिंग आणि कनिका मान मुख्य भुमिकेत आहे. त्यात अभिनेत्री शुभी शर्मा ‘चांद’च्या भुमिकेत आहे. याआधीही ती ‘साथ निभाना साथीया’, मन की आवाज प्रतिज्ञा २, ‘सावी की सवारी’, ‘नथ’ आणि ‘इश्क की दास्तान-नागमणि’ यासारख्या मालिकांमध्ये दिसली होती. अभिनेत्री शुभी शर्माने तिच्या आयुष्यातील अडचणींबद्दल सांगितले.

समाजाकडुन तिरस्कार
अभिनेत्री शुभी शर्माने सांगितले की, “तीला शाळेच्या दिवसांपासुनच अडचणीमचा सामना करावा लागला होता. जेव्हा आम्हला समजायला लागतं, तेव्हा पासुनच आम्हाला अडचणींचा सामना करावा लागतो. समाज तिरस्काराची वागणुक देतो. कायम एका वेगळ्या दृष्टीने आमच्याकडे पाहीले जाते. एवढेच नाही तर आमच्या परिवारालासुद्धा हिनतेची वागणुक दिली जाते. जे खुप त्रासदायक आहे.माझे कधीच मित्र-मैत्रिण नव्हते. खुप कमी लोक होते जे शाळा आणि कॉलेजमध्ये माझ्यासोबत होते. शिक्षा पुर्ण केल्यानंतर प्रेम आणि समर्थनासाठी ट्रांसजेंडर समुदायाकडे गेले त्यांनी खुप प्रेमाने जवळ केलं.”

घरातुन पळून मुंबईत आली
याशिवाय तीने सांगितले, “मला अभिनयात करियर करायच आहे हे जेव्हा मी घरी आई, वडील आणि भाऊ-बहीणींना सांगितल तेव्हा त्यानी मला सर्मथन केल नाही. म्हणुन मला घरातुन पळुन जाव लागलं. मुंबईत आल्यानंतर राहण्यासाठी जागा शोधणं माझ्यासाठी सर्वात कठीण आणि महत्वाच होत. सुरवातीला मुलांच्या पीजीमध्ये जागा मिळाली पण त्यात राहणं कठीण होत. ट्रांसजेंडर असल्यामुळे मी सेक्स वर्कर असेल असं समजुन कोणीही मला राहण्यासाठी जागा द्यायला तयार नव्हतं.”

बॉलीवूड मध्ये हवा सम्मान
शुभी शर्माने सांगितले की, एलजीबीटीक्यू+ समुदायातील लोकांना बॉलीवूडमध्ये पुरेश्या संधी मिळत नाही. पुढे ती म्हाणाली  ऐवजी ‘नवाजुद्दीन सिद्दीकी’ला (Nawazuddin Siddiqui) ‘हड्डी’ मध्ये ट्रांसजेंडरची भुमिका दिली गेली. ‘शक्ती अस्तित्व के एहसास की’ मध्ये रूबिना दिलैकला (Rubina Dilaik) ट्रांसजेंडरची भुमिका मिळाली. आम्ही सुद्धा सुंदर आहोत. आम्हालाही अभिनय करता येतो. परंतु आम्हाला फक्त प्रोमोशनसाठी, गर्दी करण्यासाठी बोलवल जातं. अभिनेत्री शुभी शर्माने करण जौहरला ट्रांसजेंडरला बॉलीवूड मध्ये संधी देण्याची विनंती केली आहे, आम्हीसुद्धा माणसं आहोत,सक्षम आहोत. मी ऐकल आहे दुसर्या देश्यांमध्ये मनोरंजन उद्योगात भारता सारखा भेदभाव करत नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘राम मंदिर ट्रस्टला यापूर्वीच 14 लाख रुपयांची देणगी केलीये दान, ‘हनुमान’ दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांचा खुलासा
आमिर खानच्या लेकीच्या लग्नाच्या रिसेप्शनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावली हजेरी, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा