सारा तेंडुलकर काेणत्याना कराणाने सतत चर्चेत असते. अशातच आता तिच्याबद्दल बातमी आली आहे की, ती सिद्धार्थ केतकर नावाच्या आर्टिस्टसोबत बुलेट राईडवर गेली आहे. दोघांचा एक फोटो साेशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये दाेघांनी हेल्मेट घातलेला दिसत असून सिद्धार्थ केरकर सेल्फी घेत आहे. ज्यात त्याने सारा तेंडुलकरच्या कमरेत हात घालून पोज दिली आहे.
सारा तेंडुलकर (sara tendulkar) हिच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहण्यासारखे आहे. दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. सारा तेंडुलकरचा हा फोटो एका फॅन पेजने शेअर केला आहे. फोटो शेअर करून फक्त 27 मिनिटे झाली असता यावर हजारो लाईक्स आले आहेत. त्याच वेळी, कमेंट बाॅक्स प्राइवेट करण्यात आला आहे. विशेषबाब म्हणजे फाेटाेसाेबत काहीही कॅप्शन लिहिलेले नाही. यामुळे दोघांमध्ये मैत्री आहे की, दोघेही एकमेकांना पसंत करतात हे कळत नाही.
विशेष म्हणजे, सिद्धार्थ केरकरने त्याच्या इंस्टाग्राम आयडीवर स्वतःला आर्टिस्ट म्हणून वर्णन केले आहे. त्याचबरोबर तो गोव्यात राहत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. तो एक कलाकार आहे, ज्याला चित्रकला आवडते. याशिवाय सिद्धार्थ केरकरने त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये तो जिममध्ये पोज देताना दिसत आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपुर्वी सिद्धार्थ केरकरने सारा तेंडुलकरसोबतचा हा फोटो त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला होता. यासोबत त्यांनी सारा तेंडुलकरला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. फोटोवर प्रतिक्रिया देताना सारा तेंडुलकरने त्याला रिप्लाय देत लिहिले, ‘धन्यवाद बेस्टी. तुमच्यासोबत अजून बरीच एडवेंचर बाकी आहेत.'(shubman gill ex girlfriend sara tendulkar photo with actor siddharth kerkar goes viral on `social media)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सुनील शेट्टीने पहिल्यांदाच दाखवली आपल्या आलिशान बंगल्याची झलक, पाहा व्हिडिओ
सलमान खान सोबतच्या ‘त्या’ सीनमुळे माधुरीने ‘हम साथ साथ है’ चित्रपटाला दिला होता नकार, वाचा कारण