Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड 93 लाखांचा फ्लॅट आणि एक मुलगी – डीलच्या गाेष्टी समाेर

93 लाखांचा फ्लॅट आणि एक मुलगी – डीलच्या गाेष्टी समाेर

श्रेव्ता तिवारीने (Shweta Tiwari) राजा चौधरीपासून (Raja Chaudhary) घटस्फाेट घेटल्यानंतर एक समजूत केली हाेती. तिने लाखाेंचा घर राजा चौधरीच्या नावावर केलं, पण त्याच्या बदल्यात त्याने पलकच्या आयुष्यात न येण्याचं कबूल केलं हाेतं.

टीव्हीवरची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीचं लग्नाचं आयुष्य बरंच गाेंधळात गेलं. तिने दाेन वेळा लग्न केलं, पण दाेन्ही वेळा घटस्फाेट झाला. तिनं पहिलं लग्न 1998 साली राजा श्वेता चौधरीशी केलं हाेतं. त्यांची एक मुलगी आहे, पलक तिवारी. पण लग्नाच्या 9 वर्षांनी श्वेताने राजापासून वेगळं हाेण्याचा निर्णय घेतला. श्वेता तिवारीनं घटस्फाेटाच्या वेळी राजा चौधरीवर मारहाणीचे आणि त्रास देण्याचे गंभीर आराेप केले हाेते. तिला तिची मुलगी पलक तिवारीची संपूर्ण जबाबदारी आपल्या जवळच राहावी, असं हाेतं. ती पलकला तिच्या वडिलांपासून, म्हणजे राजापासून, पूर्णपणे दूर ठेवू पाहत हाेती. म्हणूनच तिने राजासाेबत एक डील केली हाेती.

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपाेर्टमध्ये असं सांगितलं गेलं हाेतं की, श्रेव्ता तिवारी आणि राजा चौधरी यांच्यात एक समजूत झाली हाेती. श्रेव्ताच्या वकिलांनी राजाला सांगितलं हाेतं की, घटस्फाेटानंतर ताे त्यांची मुलगी पलकला भेटायचं नाही. ही अट मान्य करताना राजाने पण एक अट ठेवली, मलाडमधलं जे घर दाेघांच्या नावावर हाेतं, ते पूर्णपणे त्याच्या नावावर करुन द्यावं. श्वेताने ही अट मान्य केली आणि ते घर राजाच्या नावावर केलं. त्या घराची किंमत सुमारे 93 लाख रुपये हाेती, असं सांगितलं जातं.

आता घतस्फाेटाला खूप वर्ष झाल्यावर राजा चौधरीनं फ्लॅटच्या कराराबद्दल खुलासा केला आहे. हिंदी रशला दिलेल्या एका मुलाखतीत ताे म्हणाला, “तेव्हा काेणीही मला भाड्यानं फ्लॅट द्यायला तयार नव्हतं, म्हणून मला माझा स्वतःचा फ्लॅट मिळणं गरजेचं हाेतं. श्वेता मला काहीच द्यायला तयार नव्हती, पण काेर्टामुळे ताे फ्लॅट मला मिळाला. तिने एक काॅन्ट्रॅक्ट करुन घेतलं हाेतं, ज्यावर तिनं माझ्याकडून सही घतली. त्या करारात असं हाेतं की ती मला तेव्हाच घटस्फाेट देईल, जेव्हा मी पलकला कधीच भेटणार नाही, याला मी तयाक हाेईन”.

राजा पुढे म्हणाला, “आपण दोघं एकमेकांमधील प्रॉब्लेम सोडवतो का नाही, ते वेगळं आहे. पण माणूस म्हणून तरी एकदा तरी आपण या गोष्टीवर बोलायला हवं होतं. पण श्वेतानं तसं न करता मला थेट माझ्या मुलीपासून दूर केलं, तेही खूप कठोरपणे. हे योग्य नव्हतं. तिनं असं फक्त म्हणून केलं कारण तिच्याकडे जास्त ताकद होती आणि ती जास्त प्रभावशाली होती.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

जेठालाल आणि बबीता सोडणार तारक मेहता शो; खुद्द निर्माते असित मोदी यांनी सांगितले सत्य…

हे देखील वाचा