टीव्ही जगतातली आवडती सून म्हणून घराघरात आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमी तिच्या सौंदर्याबद्दल चर्चेत असते. तिचा मोहक अवतार बर्याचदा इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतो. आता पुन्हा एकदा तिचे काही फोटो प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत. चला तर मंडळी आपण सर्वांच्या लाडक्या सुनेचे आज सोशल मीडियावर मोठी चर्चा होणारे फोटो पाहणार आहोत.
अभिनेत्री श्वेता तिवारीने नुकतेच काळ्या रंगाचा शिमरी गाऊन परिधान करून फोटो शेअर केले आहेत. श्वेता या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. श्वेता ब्लॅक आउटफिटमध्ये प्रेक्षकांना वेड लावत आहे. चाहतेही तिच्या या फोटोंवर बऱ्याच प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. हे लूक पाहून तिचे वय वाढतंच नाहीये असे प्रेक्षक म्हणातायत.
श्वेता या जबरदस्त लूकमध्ये अत्यंत आत्मविश्वासी दिसत आहे. श्वेताने परिधान केलेला ड्रेस हा एक हाय स्लिट ड्रेस असून ती एका अवॉर्ड फंक्शनसाठी तयार झालेली दिसून येते. श्वेताची स्टाईल नेहमीच प्रभावी असते. या फोटोमध्येही श्वेता नेहमीप्रमाणे स्टाईलिश डीवा दिसत आहे. श्वेताच्या मेक-अपने तिच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे. त्यामुळे ती परिपूर्ण सुंदर दिसत आहे.
टीव्ही विश्वात ‘प्रेरणा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्वेताने ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून आपल्या अभिनयाची सुरुवात केली . ‘बिग बॉस’ या प्रसिद्ध शोमध्ये श्वेता तिवारी चौथ्या सत्राची विजेती ठरली होती. तसेच, श्वेताने कसौटी जिंदगी की शिवाय ‘नागीन’, ‘सजन रे झुठ मत बोलो’, ‘परवरीश’ आणि ‘बालवीर’ यासारख्या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. श्वेता तिवारी शेवटी ‘बेगूसराय’ मालिकेत दिसली होती.










