Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

लाडकी लेक पलकबरोबर विमानतळावर स्पॉट झाली श्वेता तिवारी; नेटकरी म्हणाले, ‘आई नेमकी कोण?’

छोट्या पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या तिच्या मुलीबरोबर सुट्ट्या एन्जॉय करत आहे. श्वेता आणि तिची मुलगी पलक शक्य तितका वेळ एकत्र घालवतात. अशात पलक बॉलिवूडमध्ये येण्याआधीच तिच्या हॉट लूकमुळे चर्चेत आहे. ती नेहमी सोशल मीडियावर मादक अंदाजामध्ये पाहायला मिळते.

श्वेता आणि तिची मुलगी पलक या दोघींचा वाढदिवस ऑक्टोबर महिन्यातच असतो. त्यामुळे त्या आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर फिरायला गेल्या होत्या. सध्या या दोघींचा विमानतळावरील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये श्वेताने पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि निळी पँट घातली आहे. तसेच पलक नेहमीप्रमाणे हॉट लूकमध्ये दिसली. तिने पोपटी रंगाचा ड्रेस घातला आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानीने या दोघींचा विमानतळावरील हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या रील व्हिडिओमध्ये ‘लव यू जिंदगी’ हे गाणं देखील ऐकू येत आहे.

या दोघींच्या चाहत्यांनी यावर हार्ट ईमोजीचा वर्षाव केला आहे. तसेच अनेक कमेंट देखील या व्हिडिओवर आल्या आहेत. यामध्ये एकाने लिहिले आहे की, “आई नेमकी कोण आहे?” श्वेता आणि पलक या मायलेकी या व्हिडिओमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

पलक लवकरच सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. ‘रोजी: द सॅफरन चॅप्टर’ चित्रपटामध्ये ती झळकणार आहे. यामध्ये विवेक ओबेरॉय तिच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

श्वेता तिवारीबाबत बोलायचं झालं, तर आपल्या अभिनयाने खूप प्रसिद्धी मिळवली आहे. ‘बिग बॉस ४’ ती विजेती देखील आहे. ‘बिग बॉस’नंतर ‘खतरों के खिलाडी’ मध्ये देखील आपले नशीब आजमावतना ती दिसली होती. या दोन्ही शो मध्ये तिला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दाक्षिणात्य अभिनेत्री अमायरा दस्तूरने बिकिनी फोटोत केला कहर; पाहून चाहताही म्हणाला, ‘देवाने मला…’

-भारीच ना! अक्षरा सिंगचे ‘दिल की पुकार’ गाणे चाहत्यांच्या भेटीला; एकाच दिवसात मिळाले लाखो हिट्स

-Video: दुर्गा पूजेदरम्यान काजोल भावुक; काकांना मिठी मारत लागली रडू

हे देखील वाचा