Monday, July 1, 2024

मोठी बातमी! हिंदी सिनेमातील ‘या’ जेष्ठ दिग्दर्शकांच्या दोन्ही किडन्या निकामी?

हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक ज्यांनी त्यांच्या उत्तम कलाकृतींमधून प्रेक्षकांच्या मनावर नववा कोर्ट मोठे नाव कमावले अशा श्याम बेनेगल यांना कोणी ओळखत नाही असे होणारच नाही. श्याम बेनेगल हे आजच्या पिढीतील सर्वच कलाकारांसाठी एक आदर्श आहे. खऱ्या आयुष्याला त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांसमोर आणले. सामान्य लोकांचे जीवन आणि त्यांचा संघर्ष अशा पद्धतीने कॅमेऱ्यात कैद केला की पाहणारे सर्वच लोकं दंग झाले. तब्बल ८ राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या प्रतिभावान दिग्दर्शक असलेल्या श्याम बेनेगल यांना मात्र आता उतार वयात खूप त्रास सहन करावा लागत आहे.

दिग्दर्शक श्याम बेनेगल सध्या ८८ वर्षाचे असून, त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार चालू आहेत. ८८ वर्ष वय असूनही ते काम करत आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांचे शरीर त्यांना साथ देत नसून त्यांची तब्येत खराब झाली आहे. त्यांच्या शरीराच्या काही चाचण्यांनुसार त्यांना किडनीचा त्रास सुरु झाला आहे. त्यांना सक्तीचा आराम सांगितलं गेला असून, त्यांचे घरच्या घरी डायलिसिस चालू झाल्याची देखील माहिती आहे. मात्र अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही, किंवा त्यांच्या कौटुंबातल्या लोकांनी याबाबत माहिती दिली नाही. त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांनी सांगितले की ते ठीक होते २/३ दिवसांपासून ते ऑफिसला येत नाही फक्त.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान श्याम बेनेगल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मश्री आणि पादभूषण आदी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांनी त्यांच्या करियरमध्ये जुबैदा, द मेकिंग ऑफ द महात्मा, नेताजी सुभाष चंद्र बोसः द फॉरगोटन हीरो, मंडी, आरोहन, वेलकम टु सज्जनपुर आदी अनेक सुंदर सिनेमे बनवले आहेत.

श्याम बेनेगल हे वयाच्या ८८ व्या वर्षी देखील काम करत असून, ते सध्या त्यांच्या आगामी ‘मुजीब द मेकिंग ऑफ नेशन’ सिनेमाला घेऊन खूपच बजमध्ये आहेत. हा सिनेमा भारत आणि बांग्ला यावर आधारित असून, शेख मुजीबुर्रहमान यांच्या जीवनावर आहे. या सिनेमाचे पोस्टर खूप आधीच प्रदर्शित केले गेले असून, सततच्या वादांमुळे या सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलले जात आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम शैलेश लोढांनी सांगितलं सीरियल सोडण्यामागील खरं कारण, म्हणाले…
काम मिळवण्यासाठी ‘गंगुबाई काठियावाडी’ फेम ‘या’ अभिनेत्रीचा 40 वर्षे संघर्ष, सावळा रंग ठरले कारण

हे देखील वाचा