Sunday, June 1, 2025
Home बॉलीवूड सिद्धांत चतुर्वेदीने नव्या नवेलीला डेट करण्याबाबत तोडले मौन; म्हणला,’ मी कोणाला…’

सिद्धांत चतुर्वेदीने नव्या नवेलीला डेट करण्याबाबत तोडले मौन; म्हणला,’ मी कोणाला…’

‘गली बॉय’ फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी(Siddhant Chaturvedi) सध्या त्याच्या फोन भूत या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री कॅटरिना कैफ, आणि ईशान खट्टरसह दिसणार असून सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा(Navya Naveli Nanda) हिच्यासोबत त्यांचे नाव बऱ्याच काळापासून जोडले गेले आहे. याबाबत दोघांनाही विचारलं असता, अनेकदा त्यांनी यावर भाष्य करणं टाळल्याचं दिसलं. आता स्वत: सिद्धांतने त्याच्या आणि नव्याबरोबरच्या नात्याबद्दल मुलाखतीत खुलासा केला आहे.

सिद्धांत सध्या त्याच्या आगामी हॉरर-कॉमेडी ‘फोन भूत’ च्या रिलीजची वाट पाहत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ आणि ईशान खट्टर असणार आहेत. माध्यमाच्या वृत्तानुसार, ‘फोन भूत’च्या प्रमोशनदरम्यान सिद्धांतने स्वतःला सिंगल म्हटले होते.

माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सिद्धांतने नव्याबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. तो म्हणाला, “मी कोणाला तरी डेट करत आहे, अशा चर्चा सुरू आहेत. पण हे सत्य नाही”. यावरुन सिद्धातं कोणालाही डेट करत नाहीये, असं दिसतंय. परंतु, नव्या आणि सिद्धांत खरंच एकमेकांना डेट करत आहेत की नाही, याबद्दल त्यांच्या चाहत्यांनाही उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी मनीष म्हलोत्राच्या दिवाळी पार्टीत हे दोघे एकत्र दिसले होते. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होते.

हॅलोवीनच्या दिवशी, सिद्धांतने सुपरहिरो शक्तीमानच्या रुपात दिसला होता. त्याने इंस्टाग्रामवर रील पोस्ट केली आणि लिहिले, ‘माफ करा शक्तिमान.’ तिच्या व्हिडिओने तिचे चाहते आणि मित्र तसेच नव्याला आनंद दिला. सिद्धांतने 2017 मध्ये ‘लाइफ सही है’ या टीव्ही मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. गेहरायिया, बंटी और बबली २,गली बॉय या चित्रपटात तो दिसला. सिद्धांतचा आगामी ‘फोन भूत’ चित्रपट येत्या ४ नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
भारतात परतल्यानंतर प्रियांका चोप्रा आता मुंबईतील मरिन ड्राइव्हन केली मौजमस्ती; व्हिडिओ तुफान व्हायरल

खिलाडी कुमार साकारतोय शिवाजी महाराजंची भूमिका, ‘या’ चित्रपटामधून मराठी इंडस्ट्रीत करणार पदार्पण

हे देखील वाचा