Wednesday, July 3, 2024

पर्ण पेठे अन् सिद्धार्थ चांदेकर यांच्या आगामी वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित, पाहा रोमँटिक केमिस्ट्री

प्रेम हे आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी खास व्यक्ती असते. आयुष्यातील खास व्यक्ती आणि प्रेमाचा नव्याने अर्थ सांगण्यासाठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि पर्ण पेठे सज्ज झाले आहेत. त्यांच्या आगामी वेबसीरिजमधून ते त्यांच्या प्रेमाच्या व्याख्या मांडणार आहेत. ते दोघेही ‘अधांतरी’ या रोमँटिक वेबसीरिजमध्ये दिसणार आहेत. पर्ण आणि सिद्धार्थ हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसोबत ते दोघे देखील या वेबसीरिजसाठी उत्साहित आहेत.

नुकतेच ‘अधांतरी’ या सीरिजचा ट्रेलर समोर आला आहे. या ट्रेलरमध्ये तुम्ही पाहिलं, तर पर्ण आणि सिद्धार्थची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. ते दोघेही या सीरिजमध्ये मुग्धा आणि मुकुल ही पात्रं निभावणार आहेत. यामध्ये ते दोघेही लॉन्ग डिस्टन्स रिलेशनमध्ये असतात. मात्र, त्यांच्या आयुष्यात असं काही घडत की, त्यांना एकत्र राहावं लागत. ते दोघे त्यांच्या खास रोमँटिक ट्रीपवर गेलेले असतात. त्यातच २१ दिवसाचे लॉकडाऊन लागते आणि पुढचे २१ दिवस त्यांना एकत्र राहावे लागते. (siddharth chandekar and parn pethe’s upcoming webseries adhantri’s trailer release)

आता या त्यांच्या लव्हस्टोरीमध्ये नक्की काय बदल घडणार आहे. त्यांचे नाते खुलेल की, नाही हे पाहण्यासाठी आता आपल्याला ही वेबसीरिज पाहायला लागणार आहे. सिद्धार्थ आणि पर्ण या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. जीत अशोक यांनी या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे.

‘अधांतरी’ ही वेबसीरिज बुधवारी (२५ ऑगस्ट) हंगामावर प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजमध्ये पर्ण आणि सिद्धार्थची रोमँटिक लव्हस्टोरी पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. तसेच एक आगळ्या- वेगळ्या लव्हस्टोरीसोबत मनोरंजनाचा तडकाही पाहायला मिळणार आहे.

पर्णने या आधी ‘फोटोकॉपी’, ‘अश्लील उद्योग’, ‘रमा माधव’, ‘फास्टर फेणे’, ‘विहीर’, ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘व्हाय झेड’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच सिद्धार्थने ‘क्लासमेट’, ‘वजनदार’, ‘झिम्मा’, ‘बस स्टॉप’, ‘रणांगण’, ‘हिरकणी’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ताहिराला येतेय पती आयुष्मानची आठवण; म्हणाली, ‘मला सर्वांसमोर प्रेम दाखवण्याचा शौक नाही, पण आम्ही…’

-‘नसीब अपना अपना’मध्ये राधिकांनी साकारली ऋषींच्या पत्नीची भूमिका; कोट्यवधींच्या कर्जामुळे सोसावी लागली…

-ऋषी अन् नीतू यांच्या लग्नात सिंदूर लावून पोहोचल्या होत्या रेखा; बिग बींसोबत लग्न…

हे देखील वाचा