सिद्धार्थ-मितालीच्या घरी सुरु झाली लगीनघाई, पाहा लग्नाआधीच्या विधींचे फोटो


सध्या मराठी चित्रपटसृष्टीत एकेपाठोपाठ एक सनई चौघड्यांचे सूर ऐकू येत आहेत. अभिज्ञा भावे, मानसी नाईक, आशुतोष कुलकर्णी, प्राजक्ता परब हे कलाकार नवीन वर्षाच्या शुभमूहूर्तावर विवाहबंधनात अडकले. आता या कलाकारांनंतर अजून एक लोकप्रिय जोडी या गोड बंधनात अडकायला तयार झाली आहे. ही जोडी आहे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर.

सिद्धार्थ आणि मितालीच्या घरात आता लगीनघाई सुरू झाली आहे. या दोघांच्याही घरी लग्नापूर्वीच्या विधी आणि कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. सिद्धार्थच्या घरी नुकताच ग्रहमुखाचा कार्यक्रम पार पडला. सोबतच त्याची सोड मुंजदेखील करण्यात आली आहे. या कार्यक्रमातील फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर करत लिहिले, ‘सोड मुंज झाली. आता जातो काशीला. ओके बाय.”

दुसरीकडे मितालीनेसुद्धा मांडव पुजनाचा फोटो शेअर केला आहे.

सिद्धार्थ आणि मिताली हे मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात क्युट आणि सुंदर कपल आहे. जेव्हापासून या दोघांच्या नात्याबद्दल लोकांना समजले तेव्हापासूनच, ही जोडी लग्न कधी करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. पण आता ही प्रतीक्षा संपली असून लवकरच ही दोघे एक होणार आहेत. ही दोघे पुण्यात लग्न करणार आहेत. मात्र अजूनही त्यांनी त्यांच्या लग्नाची तारीख घोषित केली नाही.

मिताली आणि सिद्धार्थ यांनी २४ जानेवारी २०१९ ला साखरपुडा केला होता. २०२० सालात त्यांचे लग्न होऊ शकले असते, पण कोरोनाच्या महामारीमुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. मात्र ह्यावर्षी नवीन वर्षाचा मुहूर्त साधत ही दोघे त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे. सिद्धार्थ आणि मिताली यांना लग्नापूर्वी त्यांच्या केळवणांचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.


Leave A Reply

Your email address will not be published.