मराठी चित्रपटसृष्टीत एक असा अभिनेता आहे, ज्याला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण त्याला ओळखतात. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, तो अभिनेता कोण आहे? तो अभिनेता इतर कुणी नसून आपल्या सर्वांचा लाडका ‘सिद्धू’ अर्थात सिद्धार्थ जाधव होय. सिद्धार्थने आपल्या अभिनयाच्या जादूने चाहत्यांच्या मनात मानाचे स्थान निर्माण केले आहे. आपल्या विनोदाने तर त्याने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले आहे. अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणारा सिद्धू सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. तो नेहमीच आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट चाहत्यांसोबत शेअर करत असतो. रविवारी (२२ऑगस्ट) सर्वत्र रक्षाबंधन साजरे होत आहे. अशातच सिद्धूने त्याच्या बहिणीसोबत फोटो शेअर केले आहेत.
सिद्धार्थने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या बहिणीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याने सेल्फी शेअर केली आहे. यासोबत त्याने त्याच्या मुलांचेही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, सिद्धार्थची बहीण अगदी त्याच्यासारखी दिसते. ते दोघेही अगदी हुबेहूब दिसत आहेत. हे फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “रक्षाबंधन स्पेशल पंकजाक्षी जाधव.” त्याच्या या फोटोला त्याचे अनेक चाहते कमेंट करत आहेत. तेजस्विनी पंडितने देखील या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. तर एका चाहत्याने “सर जुडवा” अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Siddharth Jadhav share a photo with his sister on social media)
सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने २००४ साली ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटात पहिल्यांदा काम केले होते. यानंतर त्याने ‘जत्रा’, ‘जबरदस्त’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘दे धक्का’, ‘गलगले निघाले’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘हुप्पा हुय्या’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘कुटुंब’, ‘फास्टर फेणे’, ‘जत्रा’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘दे धक्का’, ‘हुप्पा हुय्या’, ‘टाईम प्लीज’, ‘धुरळा’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे.
त्याच्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्याला बॉलिवूडमधूनही ऑफर आल्या. त्याने ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘सिटी ऑफ गोल्ड’, ‘राधे’ आणि ‘सिंबा’ या हिंदी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘सिंबा’ चित्रपटात त्याने रणवीर सिंगसोबत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-खण स्कर्ट घालून रुपाली भोसलेने शेअर केले ‘हटके’ फोटोशूट, मात्र सर्वत्र रंगलीय ड्रेसची चर्चा
-‘ही’ व्यक्ती आहे अंकिता लोखंडेसाठी खूप खास; फोटो शेअर करत म्हणाली, ‘तू माझ्यासाठी…’