मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव अर्थात आपला सिद्धू. आपल्या विनोदी भूमिकाने त्याने स्वतःचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग निर्माण करत ओळख तयार केली. लुक्सपेक्षा अधिक प्रतिभेच्या जोरावर यश मिळवता येते हे सिद्धार्थने सिद्ध करून दाखवले आहे. मोठ्या मेहनतीने आणि जिद्दीने तो या क्षेत्रात आला आणि यश संपादन केले. त्याची स्टोरी, संघर्ष सगळ्यांसाठीच एक प्रेरणा आहे. सिद्धार्थला अमाप फॅन फॉलवोइंग आहे. सोशल मीडियावरही त्याची क्रेझ नेहमीच दिसून येते. तो देखील त्याच्या फॅन्सचे नेहमीच विविध पोस्ट शेअर करत मनोरंजन करत असतो.
सिद्धार्थ जेवढा वेळ कामाला देतो, तेवढाच वेळ तो नेहमीच त्याच्या कुटुंबाला देतो. तो एक कुटुंब वत्सल व्यक्ती आहे हे सर्वानाच माहित आहे. त्याला दोन मुली असून, तो नेहमीच त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्यासाठी त्याच्या मुली आधी महत्वाच्या असतात. आता देखील सिद्धार्थने त्याचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला असून, यात त्याची मोठी मुलगी ईरा त्याला चक्क डान्स शिकवत आहे.
View this post on Instagram
सिद्धार्थने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “जेव्हा आपली मुलगी बापाला डान्स शिकवते आणि बापाला डान्स जमत नाही. तेव्हा बापाचा आनंद Calm Down कसा होईल…”. व्हिडिओमध्ये सिद्धार्थ आणि ईरा ‘बेबी कामडाऊन’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. लेकीसोबत डान्स करताना सिद्धार्थच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच ओसंडून वाहताना दिसत आहे. या व्हिडिओवर आणि त्याच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या जोडीचे कौतुक केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! लग्नाच्या आधी ज्युनियर एनटीआर ‘या’ कारणामुळे अडकला होता कायद्याच्या कचाट्यात
नवाजुद्दीन सिद्दीकीचे ‘ते’ सदाबहार डायलॉग, ज्यावर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव