Saturday, July 6, 2024

क्या बात है! सिद्धार्थ जाधव आणि शिव ठाकरे यांची आयपीएलमध्ये एन्ट्री, पोस्ट शेअर करत व्यक्त केला आनंद

एप्रिल महिना सुरु झाला की, वेध लागतात ते आयपीएलचे. इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल सुरु झाल्यांनतर आपले संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले आहे. जवळपास दीड महिना हा आयपीएलचा थरार चालू असतो. आयपीएलची क्रेझ संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर असते. प्रत्येक प्रांतातील लोकांची ही क्रेझ पाहून लोकांचा यात अजून रस वाढावा यासाठी आयोजकांनी हिंदी आणि इंग्लिशमध्ये चालणारी कॉमेंट्री आता अनेक प्रादेशिक भाषांमध्ये सुरु केली. यामुळे अनेक लोकांना त्यांच्या मायभाषेत क्रिकेटबद्दल माहिती मिळाल्यामुळे त्यांचा आयपीएलमधील रस अधिकच वाढत असून, लोकांचा अधिक प्रतिसाद याला मिळत आहे.

आता आयपीएलच्या सामन्यांचे समालोचन हे मराठीत सुद्धा केले जात असून, याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आयपीएल २०२३ च्या मराठी समालोचनासाठी यावेळेस तर मराठी आणि हिंदीमध्ये आपल्या अभिनयाने नावलौकिक कमावणारा सिद्धार्थ जाधव आणि हिंदी बिग बॉसमधु प्रेक्षकांची मने जिंकणारा शिव ठाकरे कमेंट्री करताना दिसत आहे. या दोघांनी या निमित्ताने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली. सिद्धार्थ आणि शिव यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचे समालोचनाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

सिद्धार्थने हे फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी मराठी, तू मराठी, टाटा आयपीएल मराठी समालोचन करताना मला पाहताय ना…” तर शिव ठाकरेने देखील त्याचा एक व्हिडिओ शेअर करत लिहिले, “दिग्गजांसोबत आयपीएल २०२३ चा भाग होणं हा माझ्यासाठी एक सुंदर अनुभव होता. सिद्धार्थ दादा तुला खूप खूप प्रेम.” दरम्यान सिद्धार्थ आणि शिव या दोघांच्याही करिअरमध्ये आयपीएलसाठी समालोचन करण्याचीही पहिलीच वेळ आहे. त्यांच्या फॅन्सला देखील या दोघांना या वेगळ्या भूमिकेत पाहून अत्याधिक आनंद झाला आहे. कमेंट्स करत त्यांचा आनंद व्यक्त करत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

दुःखद! प्रसिद्ध रंगभूमिकार आणि अक्षरा थिएटरच्या सहसंस्थापक असलेल्या ‘या’ जेष्ठ अभिनेत्रींचे निधन

वयाच्या 15 व्या वर्षी केले सिनेसृष्टीत पदार्पण, लग्न करताना धर्मांतर करून आयशा टाकियाने केले सर्वाना आश्चर्यचकित

हे देखील वाचा