मराठी चित्रपसृष्टीतील एक असा चमचमणारा आहे, ज्याला आज कोणत्याही परिचयाची ओळख नाही. अगदी ज्येष्ठांपासून ते तरुणांपर्यंत ज्याचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे, तो म्हणजे ‘सिद्धू’. आपला सर्वांचाच आवडता अभिनेता सिद्धार्थ जाधव, आपल्या जोरदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. अशातच आता मंगळवारी (२६ ऑक्टोबर) मराठी चित्रपसृष्टीतील अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच आपला लाडके ‘लक्ष्या मामा’ यांचा वाढदिवस झाला. याच निमित्ताने सिद्धूने एक पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सिद्धूने आपल्या पोस्टमध्ये आपले मत व्यक्त केलं आहे. त्याला लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम करता आले नाही ज्याची त्याच्या मनात कायम हुरहुर राहील, असे तो म्हणाला. त्याचबरोबर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारखे थोर व्यक्तिमत्त्व ज्या ठिकाणी घडले, त्या ठिकाणीचा आपणही एक भाग आहोत याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला आहे.
सिद्धूने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक खास व्हिडिओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे. ज्यात लिहिले आहे की, “असे आदर्श मराठी मनोरंजन क्षेत्रात आहेत हाच मान, सन्मान आणि अभिमान. लक्ष्या मामांसोबत काम करता नाही आलं ही हुरहुर आयुष्यात कायम असेल.. पण त्यांच्यासारखं एक थोर व्यक्तिमत्व जिथे घडलं तिथला आपण एक भाग आहोत हेच माझ्यासाठी मोठंय Thank you लक्ष्या मामा..” त्याच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंटचा भरभरून वर्षाव करत आहेत.
असे आदर्श मराठी मनोरंजन क्षेत्रात आहेत हाच मान, सन्मान आणि अभिमान.
लक्ष्या मामांसोबत काम करता नाही आलं ही हुरहुर आयुष्यात कायम असेल..
पण त्यांच्यासारखं एक थोर व्यक्तिमत्व जिथे घडलं तिथला आपण एक भाग आहोत हेच माझ्यासाठी मोठंय ????????
Thank you लक्ष्या मामा..
सौजन्य : दूरदर्शन मुंबई pic.twitter.com/tw1FNDdJss— SIDDHARTH JADHAV ???????? (@SIDDHARTH23OCT) October 26, 2021
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ‘आई तुझे उपकार’, ‘सत्वपरीक्षा’, ‘रंग प्रेमाचा’, ‘धूमधडाका’, ‘तुझ्यावाचून करमेना’, ‘गडबड घोटाळा’, ‘धाकटी सून’, ‘कळतंय पण वळत नाही’, ‘खरे कधी बोलू नये’, ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’, ‘दे दणादण’, ‘थरथराट’, ‘येडा की खुळा’, ‘शुभमंगल सावधान’, ‘झपाटलेला’, ‘माझा छकुला’, ‘कमाल माझ्या बायकोची’, ‘पछाडलेला’ यांसारख्या चित्रपटात काम केले. यातील एक चित्रपट मात्र खूपच लक्षवेधी ठरला होता. तो म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’. या चित्रपटात त्यांनी स्त्रीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांची भूमिका खूप गाजली होती.
सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर त्याने २००४ साली ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटात पहिल्यांदा काम केले होते. यानंतर त्याने ‘जत्रा’, ‘जबरदस्त’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘दे धक्का’, ‘गलगले निघाले’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘हुप्पा हुय्या’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘कुटुंब’, ‘फास्टर फेणे’, ‘जत्रा’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘दे धक्का’, a‘हुप्पा हुय्या’, ‘टाईम प्लीज’, ‘धुरळा’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे.
त्याच्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्याला बॉलिवूडमधूनही ऑफर आल्या होत्या. त्याने ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘सिटी ऑफ गोल्ड’, ‘राधे’ आणि ‘सिंबा’ या हिंदी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘सिंबा’ चित्रपटात त्याने रणवीर सिंगसोबत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘या’ मराठी चित्रपटांना तोड नाही! लक्ष्याचे ‘हे’ पाच अफलातून चित्रपट तुम्ही पाहिलेत का?