बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर ७ फेब्रुवारी २०२३ रोजी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांनी लग्न केले आहे. जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेस येथे त्यांनी मोठ्या गाजवाज्यात मात्र मीडियापासून लांब लग्न केले. लग्नानंतर सर्वानाच त्यांच्या फोटोंची आतुरता होती. कियारा आणि सिद्धार्थ यांनी त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतर नुकतेच त्यांना लग्नानंतर पहिल्यांदा सोबत स्पॉट करण्यात आले आहे.
View this post on Instagram
लग्न झाल्यानंतर हे नवविवाहित जोडपे जैसलमेरहून दिल्लीला रवाना झाले तेव्हा त्यांना जैसलमेर एयरपोर्टवर सोबत पहिले गेले. यावेळी दोघांची लूक एकदम साधा होता. त्यानंतर त्यांना दिल्ली एयरपोर्टवर पुन्हा पाहिले गेले. तेव्हा दोघांनी लाल रंगाचे कपडे घातले होते. यावेळी त्यांनी मीडियासमोर येत फोटो सेशन केले. आता त्यांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लग्नानंतर कियारा आणि सिद्धार्थने लाल रंगाचे कपडे घालत ट्विनिंग केले होते. दिल्लीला पोहचल्यावर सिद्धार्थच्या घरी नव्या सुनेचे मोठ्या दणक्यात ढोल वाजवत नाचत गात स्वागत केले गेले. याचे काही व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत.
कियारा आणि सिद्धार्थ जैसलमेरहून वेस्टर्न ड्रेसमध्ये निघाले होते. मात्र दिल्लीला आल्यावर ते एथनिक लूकमध्ये दिसले. यावेळी कियाराने लाल रंगाचा सलवार सूट, त्यावर नेटचा दुपट्टा घातला होता. यावेळी तिच्या भांगेत कुंकू देखील दिसले. तर सिद्धार्थने लाल रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा घालत त्यावर एम्ब्रॉइडरी असलेली शाल घेतली होती. यावेळी या दोघांनी मीडियामध्ये मिठाई देखील वाटली.
View this post on Instagram
प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार आता कियारा आणि सिद्धार्थ यांच्या रिसेप्शनची तयारी चालू आहे. या दोघांच्या लग्नाचे रिसेप्शन दिल्ली आणि मुंबई दोन्ही ठिकाणी असणार आहे. दिल्लीला रिसेप्शन ९ फेब्रुवारी रोजी असेल तर १२ फेब्रुवारीला मुंबईमध्ये होईल. या रिसेप्शनला बॉलिवूडमधील सर्वच कलाकार मंडळी हजेरी लावणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
काली काली जुल्फों के …! रिधीमा पंडीतची घायाळ करणारी अदा, पाहाच फोटो गॅलरी
अनुपम खेर यांनी ट्विट करत ‘या’ सुपरहिट सिनेमाच्या सिक्वलची केली मागणी, अक्षय कुमारने देखील दिला दुजोरा