Monday, July 1, 2024

सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाच्या तारखेत बदल, ६ फेब्रुवारी ऐवजी ‘या’ दिवशी कपल अडकणार विवाहबंधनात

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल असणारे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. राजस्थानमधील जैसलमेर येथे मोठ्या धुमधडाक्यात त्यांचे लग्न होणार असून, सध्या त्यांच्या लग्नाचे प्री वेडिंग फंक्शन चालू झाले आहेत. या लग्नावर त्यांच्या चाहत्यांसोबतच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यांना लग्नाच्या वेशभूषेत बघण्यासाठी सर्वच उत्सुक झाले आहेत. त्यांच्या लग्नाबाबबद्दल सर्व अपडेट घेण्यासाठी देखील लोकांमध्ये आतुरता दिसत आहे. आता लग्न म्हटल्यावर कियारा नक्कीच अतिशय उत्तम पद्धतीने तयार होणार हे नक्कीच. हा दिवस कायम स्मरणात ठेवण्यासाठी ती आणि तिची टीम मेहनत घेत आहे. यातच आता कियारा अडवाणीला कोण तयार करणार हे समोर आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

प्रसिद्ध आणि लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट स्वर्णलेखा गुप्ता कियाराला नववधूच्या वेशात तयार करणार आहे. स्वर्णलेखा या इतर आर्टिस्ट आणि टीमसोबत ४ फेब्रुवारीला जैसलमेरला पोहचल्या आहेत. सोबतच कियाराचे हेयर स्टायलिस्ट अमित ठाकूर देखील जैसलमेरला पोहचले आहेत. स्वर्णलेखा यांचे नाव बॉलिवूडमध्ये सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध असून, त्यांनी माधुरी दीक्षित, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, ब्रूना अब्दुल्ला, आलिया भट्ट, परिणीति चोपड़ा, अदिति राव हैदरी आदी अनेक मोठ्या अभिनेत्रींसोबत काम केले आहे. कियाराला देखील ‘कबीर सिंग’ सिनेमात ‘नो मेकअप लूक’ त्यांनीच दिला होता. याशिवाय तिला अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी तयार केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तत्पूर्वी सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाची तारीख बदलली आहे. ६ नाही तर ७ फेब्रुवारी रोजी ते लग्न करणार आहे. आता सिद्धार्थ आणि कियारा त्यांच्या कुटुंबासोबत आणि त्यांच्या टीमसोबत जैसलमेरला पोहचले आहेत. याशिवाय मनीष मल्होत्रा, शाहिद कपूर, मीरा राजपूत, करण जोहर आदी सेलेब्स देखील या लग्नसाठी पोहचले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शेखर सुमनने प्रियंका चौधरी अन् एमसी स्टॅनवर केला रॅप, स्पर्धक हसून हसून लाेटपाेट

सुकेशने तुरुंगातून पुन्हा लिहिले पत्र; म्हणाला, ‘मी चाहत खन्नासारखा गोल्ड डिगर …’

हे देखील वाचा