Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘…तोच खरा मजनू’, सिद्धार्थ मल्होत्राच्या मिशन मजनू सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

जानेवारी महिन्यामध्ये अनेक मोठमोठ्या सिनेमांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. अनेक सुपरस्टारमध्ये या महिन्यात जोरदार टक्कर पाहायला सर्वांनाच मजा येणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा सध्या त्याच्या आणि कियारा अडवाणीच्या लग्नामुळे खूपच चर्चेत आहे. मात्र आता तो एका नवीन गोष्टीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकताच त्याच्या आगामी ‘मिशन मजनू’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर लाँच झाला आहे. सिद्धार्थ आणि रश्मिका यांची मुख्य भूमिका असलेल्या मिशन मजनू या सिनेमाची प्रेक्षकांना बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती.

 

मिशन मजनू या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा एका रिसर्च अँड अनॅलिसिस रॉ एजेंट अमनदीप सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याला पाकिस्तानमध्ये होणाऱ्या अवैध स्वरूपात बनवल्या जाणाऱ्या परमाणू हाथियार कार्यक्रमात घुसखोरी करण्याचे काम सोपवण्यात आलेले असते. ट्रेलरमध्ये जबरदस्त ऍक्शन, रोमान्स, थरार पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लँटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. नेटफ्लिक्सने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून हा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ट्रेलर प्रदर्शित करताना नेटफ्लिक्सने कॅप्शनमध्ये लिहिले, “जो स्वतःआधी देशासाठी विचार करतो, तोच खरा मजनू.”

मिशन मजनू हा सिनेमा 80 च्या दशकातील भारत पाकिस्तानमध्ये होणाऱ्या संघर्षावर भाष्य करतो. जिथे भारताच्या एका एजेंटने पाकिस्तानच्या अवैध हत्यार बनवणाऱ्या ठिकाणाचा शोध घेतला आणि त्याला उध्वस्त केले. या सानमचे दिग्दर्शन शांतनु बागची यांनी केले असून, सिनेमात अनेक दमदार कलाकारांची फौज दिसणार आहे. हा सिनेमा २० जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी सिद्धार्थचा ‘शेरशहा’ सिनेमा देखील ओटीटीवर प्रदर्शत झाला होता आणि तो तुफान गाजला. यावर्षी सिद्धार्थची रोहित शेट्टी दिग्दर्शित एका वेबसेरीजमध्ये देखील दिसणार आहे.(siddharth malhotra mission majnu trailer out)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘हा’ आहे सिद्धार्थ मल्होत्राचा फिट राहण्याचा फंडा, व्हिडिओ शेअर करून दिल्या टीप्स
हॅपी मंकरसंक्रात! अमृता फडणवीसांनी घेतला पतंग उडवण्याचा आनंद, पाहा भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा