Monday, July 1, 2024

टी-सीरिजच्या ऑफिसबाहेर स्पॉट झाला सिद्धार्थ मल्होत्रा, चाहत्यांसाठी असेल का खुशखबर?

जेव्हा जेव्हा बॉलिवूडचे चाहते नवीन किंवा आगामी प्रोजेक्टबद्दल ऐकतात, तेव्हा त्यांचा उत्साह आणखीनच वाढतो. त्यामध्ये, जेव्हा एखादा अभिनेता, निर्माता किंवा दिग्दर्शकाला भेटतो, तेव्हा त्याच्या पुढच्या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्साहाची पातळी खूप जास्त होते. येत्या काळात, भूषण कुमारच्या टी-सीरिजमध्ये अनेक चित्रपट मनोरंजन प्रेमींसाठी रिलीझ होणार आहेत. अलीकडेच प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बसू (Anurag Basu) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) ​​टी-सीरिजच्या ऑफिसबाहेर दिसले.

तो टी-सीरिजच्या ऑफिसबाहेर दिसला असल्याने, असा अंदाज आहे की अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​अनुराग बसू दिग्दर्शित चित्रपटात काम करू शकतो. तसेच, भूषण कुमारची टी-सीरिज कंपनी त्या चित्रपटाची निर्मिती करू शकते. (Siddharth Malhotra outside of t-series office)

‘शेरशाह’ या शेवटच्या चित्रपटाच्या यशानंतर सिद्धार्थ मल्होत्रा ​​लाखोंच्या हृदयाची धडकन बनला आहे. दरम्यान अनुराग बसूसोबत चित्रपट खरोखरच मोठ्या बातमीपेक्षा कमी नाही. शिवाय इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध निर्माता भूषण कुमार त्या चित्रपटाची निर्मिती करत असेल, तर बातच काही और असेल!

अशामध्ये चाहते आशा करत आहेत की, हा प्रकल्प लवकरात लवकर जाहीर होईल. पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर, सध्या हा अभिनेता बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीला डेट करत आहे. दोघेही अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट होतात. ‘कबीर सिंग’नंतर कियारा अडवाणीनेही बॉलिवूडमध्ये खास ओळख निर्माण केली आहे.

सिद्धार्थच्या आगामी चित्रपटांबाबत बोलायचे झाल्यास, तो ‘मिशन मजनू’, ‘थॅंक गॉड’ आणि धर्मा प्रोडक्शनच्या ‘अनटायटल ऍक्शन’ चित्रपटात दिसणार आहे. ‘मिशन मजनू’ या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ते दोघे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ‘थॅंक गॉड’ या चित्रपटात त्याच्यासोबत रकुल प्रीत सिंग आणि अजय देवगण असणार आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा