अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने गुरुवारी सकाळी (२ सप्टेंबर) जगाचा निरोप घेतला. सिद्धार्थच्या निधनाने त्याच्या कुटुंबीयांवर आणि चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सिद्धार्थने वयाच्या ४० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. कुणास ठाऊक होतं की, लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा अभिनेता सर्वांच्या डोळ्यात एक दिवस अश्रू आणेल? त्याचे शवविच्छेदन कूपर रुग्णालयात करण्यात आले. इंडस्ट्रीतील कलाकारांनी सिद्धार्थला श्रद्धांजली वाहत आहेत. ‘बिग बॉस’ होस्ट आणि बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खानलाही सिद्धार्थच्या निधनाने धक्का बसला आहे.
सलमान खानने एका ट्वीटमध्ये सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याने ट्वीट केले की, “खूप लवकर सिद्धार्थ गेला. तुझी आठवण येईल. कुटुंबाला संवेदन. त्याच्या आत्म्यास शांती लाभो.”
Gone too soon Siddharth.. u shall be missed. Condolences to the family .. RIP????
— Salman Khan (@BeingSalmanKhan) September 2, 2021
‘बिग बॉस १३’ मध्ये सलमान खान सिद्धार्थ शुक्लाला भेटला होता. या शोमध्ये तो आक्रमक होत असल्यामुळे सलमानकडून अनेकवेळा ओरडा खावा लागला होता, पण ‘वीकेंड का वार’मध्ये बऱ्याच वेळा सलमानने कबूल केले होते की, शोमध्ये प्रत्येकजण सिद्धार्थ विरुद्ध आपला गेम खेळत आहे. (‘Siddharth passed away very soon … you will be remembered’, said the brother paying homage to Siddharth Shukla)
अभिनेता सलमान खानने सिद्धार्थच्या स्वभावाच्या समस्यांबाबत सिद्धार्थला अनेक वेळा सल्लाही दिला होता. एकदा सलमानने सिद्धार्थला रागावर नियंत्रण ठेवण्याच्या टिप्स दिल्या होत्या. सलमानचे सिद्धार्थसोबत एक खास बाँड झाल्याचे या शोमध्ये दिसून आले होते.
कधी सलमान त्याला रागवत असायचा, तर कधी तो विनोद करत असायचा. ‘बिग बॉस १३’ दरम्यान सलमान खान देखील सोशल मीडियावर ट्रोल झाला होता की, तो नेहमी सिद्धार्थ शुक्लाच्या बाजूने उभा असतो. कारण काहीही असो, पण लोकांच्या प्रेमामुळे आणि त्याच्या चांगल्या गेम प्लॅनमुळे तो ‘बिग बॉस १३’ चा विजेता बनला.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…