Thursday, July 18, 2024

शेहनाज गिलच्या मोबाइलचे वॉलपेपर पाहून भावुक झाले ‘सिडनाज’चे फॅन्स

पंजाबची कॅटरिना अर्थात शेहनाज गिल नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. बिग बॉस १३ मध्ये झळकलेल्या शेहनाजने तुफान लोकप्रियता मिळवत अनेक फॅन्स कमावले. या बिग बॉसच्या सीझननंतर शेहनाज आणि सिद्धार्थ शुक्ला ही जोडी तुफान गाजली. या जोडीचे आजही लाखो फॅन्स आहेत. कोणाची तरी या सुंदर जोडीला नजर लागली आणि मागच्यावर्षी सिद्धार्थच्या अचानक झालेल्या निधनामुळे ‘सिडनाज’ची ही जोडी तुटली ती कायमचीच. सिद्धार्थच्या निधनाचा जेवढा त्याच्या कुटुंबाला आणि फॅन्सला धक्का बसला तेवढाच किंबहुना त्यापेक्षा अधिक मोठा धक्का शेहनाजला बसला. या धक्क्यातून सावरण्यासाठी तिला बराच काळ लागला.

नुकतेच शेहनाजला पापराजीनी स्पॉट केले. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले. या सर्व फोटोंमध्ये एक फोटो असा होतो जो पाहून सिडनाजचे फॅन्स खूपच भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. शेहनाजच्या अनेक व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये एक फोटो असा होता ज्यात शेहनाजचा मोबाइल आणि त्यावरील वॉलपेपर दिसत होते. सिडनाजच्या एका फॅन अकाऊंटवरून सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या आणि आता व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये, शेहनाजच्या वॉलपेपरवर सिद्धार्थ आणि शेहनाज यांनी एकमेकांचा हात पकडलेला फोटो दिसून आला. आता हा व्हायरल होणार फोटो पाहून त्यावर अनेक कमेंट्स सोशल मीडियावर येत आहे.

एकाने या फोटोवर कमेंट करत लिहिले, “तिचे वॉलपेपर तिचा आणि सिद्धार्थचा फोटो आहे.” तर एकाने लिहिले, “हे खूपच भावुक करणारे आहे.” हृदयविकाराच्या धक्क्याने वयाच्या ४० व्या वर्षी सिद्धार्थचे निधन झाले. सिद्धार्थ आणि शेहनाजने कधीच त्यांचे नाते सार्वजनिक पद्धतीने स्वीकारले नव्हते, ते नेहमीच मित्र असल्याचे सांगायचे. मात्र त्यांच्यातले ते खास नाते त्यांच्या फॅन्सने हेरले होते. शेहनाजने एका मासिकात दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, “लोकांसाठी ‘सिडनाज’ हा फक्त त्यांच्या आवडत्या जोडीचा एक हॅशटॅग होता, मात्र माझ्यासाठी ते एक असे जीवन होते जे फक्त मी जगले त्याचा अनुभव घेतला आणि तो कायम माझ्यासोबत राहील. फॅन्सचे खूप खूप खूप आभार ज्यांनी आमच्या जोडीला पसंत केले, आणि आमच्या हॅशटॅगला देखील प्रेम दिले. मात्र ‘सिडनाज’ हा माझ्यासाठी एक हॅशटॅग नाही तर माझे सर्वकाही आहे.”

सिद्धार्थला शेवटचे ‘बिग बॉस ओटीटी’ आणि डान्स दिवाने ३ मध्ये पाहिले गेले. शेहनाज आणि सिद्धार्थने
‘भुला दूंगा’ आणि ‘शोना शोना’ या म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

हे देखील वाचा