Tuesday, June 10, 2025
Home बॉलीवूड सिद्धार्थच्या निधनाने एक्स गर्लफ्रेंड शेफाली भावुक; म्हणाली, ‘विश्वास ठेवणे खूपच कठीण’

सिद्धार्थच्या निधनाने एक्स गर्लफ्रेंड शेफाली भावुक; म्हणाली, ‘विश्वास ठेवणे खूपच कठीण’

सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी (२ सप्टेंबर) सकाळी निधन झाले. त्याच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टी हादरून गेली आहे. सर्वांना या बातमीवर विश्वास ठेवणे कठीण जात आहे. या बातमीने इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. याचदरम्यान, सिद्धार्थची पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड देखील या बातमीने खूप भावूक झाली आहे. तिचा अजूनही विश्वास बसत नाही की, सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीवर त्याचा एक फोटो शेअर करून सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली आहे.

टीव्ही अभिनेत्री शेफाली जरीवालानी सांगितले की, सिद्धार्थ आता या जगात नाही, यावर तिचा विश्वास बसत नाही. ती म्हणाली की, “त्याच्याशी माझ्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. या गोष्टीवर विश्वास ठेवणे माझ्यासाठी खूप कठीण आहे.”

Photo Courtesy Instagramshefalijariwala

यासह तिने इंस्टाग्रामवर सिद्धार्थचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, “RIP मित्रा. मला माहिती आहे की, तू एका चांगल्या ठिकाणी आहे. आपण एक दिवस नक्की भेटू.”

बिग बॉसच्या घरात एकत्र दिसले शेफाली- सिद्धार्थ
दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने शेफाली जरीवालाला डेटही केले आहे. दोघेही ‘बिग बॉस १३’ च्या घरात दिसले होते. याच दरम्यान, शेफाली जरीवाला आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्यात खूप चांगली मैत्री दिसून आली. एवढेच नाही, तर शेफाली आणि सिद्धार्थ अनेकदा बिग बॉसच्या घरात एकत्र बसून बोलायचे.

शहनाज गिल खचली
त्याचबरोबर ही बातमी समोर येताच अभिनेत्री शहनाझ गिल पूर्णपणे तुटली आहे. शहनाझचे वडील संतोख सिंग सुख यांनी एका वेबसाईटला सांगितले की, ‘त्यांच्या मुलीची प्रकृती ठीक नाही.’ असे सांगितले जात आहे की, शहनाज गिलला ही बातमी समजताच ती शूटिंग सोडून आली. खरं तर, शहनाज गिल शूटिंगमध्ये व्यस्त होती आणि सिद्धार्थ आता नाही हे कळताच तिने शूटिंग सोडली.

अनेक कलाकारांनी केले दुःख व्यक्त
माध्यमांच्या वृत्तानुसार, सिद्धार्थ रात्री औषध घेऊन झोपला, त्यानंतर तो सकाळी उठलाच नाही. सध्या त्याचा मृतदेह मुंबईतील कूपर रुग्णालयात आहे. ही बातमी समोर येताच टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. ट्विटरवर अनेक कलाकारांनी सिद्धार्थच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याच वेळी, बरेच लोक अजूनही यावर घटनेवर विश्वास ठेवू शकत नाहीत. (Siddharth Shukla’s ex-girlfriend became passionate, posting tribute on Instagram)

टीव्ही करिअरची सुरुवात २००८ पासून
सिद्धार्थ शुक्लाचा जन्म १२ डिसेंबर 1980 रोजी मुंबईत झाला. सिद्धार्थने एक मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. साल २००८ मध्ये तो ‘बाबुल का आंगन छोटे ना’ या मालिकेत दिसला होता. परंतु २०१३ च्या ‘बालिका वधू’ या मालिकेमधून त्याला लोकप्रियता मिळाली होती. यानंतर, तो २०१४ मध्ये ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटात दिसला. याशिवाय त्याची ‘ब्रोकन बट ब्युटिफुल ३’ नावाची वेब सीरिजही त्याच वर्षी आली होती. ज्यामुळे तो बऱ्याच चर्चेत आला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिग ब्रेकिंग! सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?

सिद्धार्थ शुक्लाची चटका लावणारी एक्झिट; मॉडेलिंगने मिळाली होती आयुष्याला कलाटणी, जाणून घ्या त्याचा प्रवास

संपुर्ण यादी: बीग बॉसचे आजपर्यंतचे सर्व विजेते; शो नंतर चमकले भाग्य, जीवनात झाले यशस्वी

हे देखील वाचा