Saturday, March 21, 2026
Home बॉलीवूड एका हिंदी सिनेमाने बदलली होती सिद्धार्थची जिंदगी, एकेवेळी तीनशे रुपयांसाठी करायचा ‘हे’ काम

एका हिंदी सिनेमाने बदलली होती सिद्धार्थची जिंदगी, एकेवेळी तीनशे रुपयांसाठी करायचा ‘हे’ काम

बॉलीवूडपासून ते दक्षिणात्य चित्रपट सृष्टीपर्यंत कोणालाही सिद्धांत सूर्यनारायण यांच्यासोबत काम करायला आवडेल. कारण त्यांच्या अभिनयाने आणि अदाकारीने तो सगळ्यांनाच आपलंसं करून घेतो. त्याचा साधा भोळा स्वभाव आणि सगळ्यांशी वागण्याची, बोलण्याची पद्धत त्यामुळे सेटवरील सगळेजण त्याच्याशी खूप आपुलकीने वागतात. सिद्धार्थचा जन्म 17 एप्रिल 1980 मध्ये चेन्नई येथे झाला. आज तो त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. तर जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील कधीही न उलगडलेल्या गोष्टी.

सिद्धार्थच्या खूप कमी चाहत्यांना ही गोष्ट माहिती असेल की, सिद्धार्थला लहानपणी क्रिकेट खेळायला खूप आवडायचे, आणि क्रिकेटमध्ये करियर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. परंतु त्यामध्ये त्याला जास्त काही स्कोप न मिळाल्याने तो चित्रपट सृष्टीमध्ये आला. चित्रपट सृष्टीमध्ये त्याने नाव कमावले. सिद्धार्थ खूप कमी वयात चित्रपट सृष्टीमध्ये आला आहे.

त्यांने वयाच्या नवव्या वर्षीच पहिल्यांदा काम केले आहे. 80 च्या दशकात त्याने एका मच्छरच्या क्रीमच्या जाहिरातीमध्ये काम केले होते. या जाहिरातीमध्ये त्याने एका लहान मुलाचे डबींग केले होते. जो मुलगा आठ वेगवेगळ्या भाषेमध्ये प्रश्न विचारत असतो की, हे नक्की काय आहे.

सिद्धार्थने केलेल्या या पहिला जाहिरातीसाठी त्याला तीनशे रुपये मिळाले होते. या जाहिरातीच्या 22 वर्षानंतर दिग्दर्शक आणि निर्माते जयेन्द्र यांनी त्यांच्यासोबत पहिला चित्रपट बनवला आणि या चित्रपटात त्याने सिद्धार्थाला मुख्य भूमिका दिली. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे नाव होते ‘180.’

बाॅलीवूडमध्ये त्याने आमिर खानसोबत ‘रंग दे बसंती’ या‌ चित्रपटात काम केले आहे. त्यानंतर ‘स्ट्राइक’ या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका निभावली होती. या चित्रपटाने त्याला त्याची ओळख निर्माण करून दिली, तसेच सगळ्यांनी त्याचे खूप कौतुक केले. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला बिजनेस करू शकला नाही. पण या चित्रपटातील गाणी मात्र खूप गाजली.

सिद्धार्थने 2003 मध्ये हिरो म्हणून काम करणे सुरू केले. सध्या त्याच्या नावावर जवळपास 35 चित्रपट आहेत. रंग दे बसंती, स्ट्रायकर, चष्मे बहाद्दूर, द हाऊस नेक्स्ट डुअर व लैला या पाच हिंदी सिनेमात त्याने काम केले. ‘महासमुद्रम’ हा त्याचा आगामी चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचा लुक त्याच्या वाढदिवशी प्रदर्शित केला आहे.

हेही वाचा- सिद्धार्थबरोबर या अभिनेत्रीला करायचा होता सुखी संसार, ऐनवेळी ब्रेकअप करत केले सुपरस्टारच्या मुलाशी लग्न

हे देखील वाचा