सध्या अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मीडियामध्ये तुफान गाजत आहे. एकतर त्याने आणि अभिनेत्री कियारा अडवाणीने फेब्रुवारी महिन्यात लग्न केले आणि फॅन्सला सुखद धक्का दिला. त्यानंतर सतत ते दोघं लाइमलाईट्मधे आहे. त्यांना मीडिया वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट करताना दिसतच असते. अशातच पुन्हा एकदा सिद्धार्थला मीडियाने एयरपोर्टवर स्पॉट केले आहे. यावेळी सिद्धार्थ कॅज्युअल लूकमध्ये दिसला मात्र तो याच लूकमुळे तुफान ट्रोल होत आहे.
सोशल मीडियावर सिद्धार्थाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो गाडीतून उतरून एयरपोर्टमधे जाताना दिसत आहे. मात्र तेव्हाच नेटकऱ्यांनी त्याच्या लूकमधली एक चूक पकडली आणि त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. जीन्स आणि साधा टीशर्ट घालून सिद्धार्थ एयरपोर्टवर स्पॉट झाला. मात्र यावेळी तो त्याने घातलेल्या जीन्सचा टॅग काढायला विसरला आणि तसाच आला हेच नेटकऱ्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्याची मजा घेतली.
एयरपोर्ट लूकमध्ये हँडसम दिसणाऱ्या सिद्धार्थचे कौतुक होण्यापेक्षा ब्रँड टॅगवरून त्याला ट्रोल केले जात आहे. यावेळी या व्हिडिओवर कमेंट्स करताना एकाने लिहिले, ‘लग्नानंतर अनेकदा असे होते’, दुसर्याने लिहिले, ‘असे दिसते की कियारा वाहिनी लक्ष देत नाही’, अजून एकाने लिहिले, ‘हे लोकं पण अशा चुका करतात’. काहींनी सिद्धार्थची बाजू देखील घेतली. त्यांनी लिहिले, ‘कधीतरी घाई असे होते’, एकाने लिहिले, ‘ही भावाची स्टाइल आहे’, अजून एक लिहितो, ‘प्राइज टॅग नाही ब्रँड टॅग आहे. त्यात काही गैर नाही.’ दरम्यान हा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून त्यावर अजून भरपूर कमेंट्स येताना दिसत आहे.
तत्पूर्वी ७ फेब्रुवारी रोजी सिद्धार्थ आणि कियारा यांनी लग्न केले असून, अतिशय मोजक्या आणि जवळच्या लोकांच्या उपस्थित त्यांनी लगीनगाठ बांधली. त्यांच्या लग्नाची आणि लूकची तुफान चर्चा झाली होती.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी! हिंदी सिनेमातील ‘या’ जेष्ठ दिग्दर्शकांच्या दोन्ही किडन्या निकामी?
अभिनेत्री रिद्धिमा पंडितने घेतला मोठा निर्णय; 32 व्या वर्षी केले एग्स फ्रीज