Saturday, July 6, 2024

Indian Police Force | शूटिंगदरम्यान जब्बर जखमी झालाय सिद्धार्थ मल्होत्रा, फोटोमध्ये दाखवला रक्तबंबाळ हात

‘शेरशाह’ या चित्रपटानंतर बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या (Sidharth Malhotra) फॅन फॉलोविंगमध्ये कमालीची वाढ झाली आहे. लवकरच तो अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यासह तो ओटीटीवर पदार्पणही करणार आहे. रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) कॉप युनिव्हर्समध्ये सिद्धार्थची एन्ट्री झाली आहे. तो लवकरच ‘इंडियन पोलिस फोर्स’ नावाच्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. सध्या या सीरिजचे शूटिंग गोव्यात सुरू आहे. दरम्यान, या सीरिजच्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ जखमी झाला. एक सीन शूट करताना त्याच्या हाताला दुखापत झाली. अभिनेत्याच्या जखमी हाताचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबतचा एक सेल्फी शेअर केला आहे. या फोटोमध्ये सिद्धार्थच्या हातावर दुखापतीच्या खुणा दिसत आहेत. दुखापत असूनही त्याच्या चेहऱ्यावर हास्य असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. फोटोसोबत अभिनेत्याने शूटिंगचा एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये तो ऍक्शन करताना दिसत आहे. या पोस्टसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “नायकाचा खरा घाम, खऱ्या रक्तासारखा आहे! रोहित सर गोव्यात काही उत्तम ऍक्शन सीक्वेन्ससाठी कॅमेरे हाताळत आहेत.” (sidharth malhotra injured during the shooting of rohit shetty indian police force)

दुसरीकडे, रोहित शेट्टीनेही स्वत:चा ऍक्शन करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. यात तो हातात मोठा कॅमेरा घेऊन, पोटावर पडलेला दिसत आहे. त्याने या पोस्टला कॅप्शन दिले, ‘गोवा…ऍक्शन मोड!!! इंडियन पुलिस फोर्स.”

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सिद्धार्थने त्याच्या करिअरची सुरुवात ‘स्टुडंट ऑफ द इयर’मधून केली. १० वर्षांच्या कारकिर्दीत त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘एक व्हिलन’ हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने १०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. दुसरीकडे, त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर तो लवकरच ‘योद्धा’ आणि ‘मिशन मजनू’मध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा