Saturday, June 29, 2024

‘या’ कारणामुळे सिद्धार्थने चप्पलीने खाल्ला होता आईचा मार, वाचा अभिनेत्याबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी!

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) सध्या त्याच्या करिअरच्या शिखरावर आहे. यावर्षी अभिनेत्याचे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, यासाठी त्याला चांगली फी देखील ऑफर करण्यात आली आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर’, ‘हसी तो फसी’, ‘मरजावा’ आणि ‘शेरशाह’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनेता दिसला आहे. सिद्धार्थचा सोशल मीडियावर भला मोठा चाहतावर्ग आहे. अशातच साेमवारी (16 जानेवारी) सिद्धार्थ मल्होत्राचा वाढदिवस आहे. अभिनेता आज 38 वर्षांचा झाला आहे.

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केलंय काम
सिद्धार्थ मल्होत्राचे शिक्षण आणि पालनपोषण दिल्लीत झाले आहे. त्याने दिल्ली विद्यापीठाच्या शहीद भगतसिंग महाविद्यालयात शिक्षण घेतले. अभिनेत्याने वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली होती. यानंतर सिद्धार्थने शाहरुख खानच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.

‘स्टुडंट ऑफ द इयर’मधून केली करिअरला सुरुवात
फार कमी लोकांना माहित असेल की, सिद्धार्थ प्रियांका चोप्राचा ‘फॅशन’ चित्रपट करणार होता, परंतु काही कारणांमुळे ते होऊ शकले नाही. यानंतर 2012मध्ये सिद्धार्थने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्याच्यासोबत वरुण धवन आणि आलिया भट्ट यांनीही त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि सिद्धार्थ रातोरात स्टार झाला.

‘शेरशाह’द्वारे जिंकली मने!
यानंतर अभिनेता ‘एक व्हिलन’मध्ये श्रद्धा कपूरसोबत दिसला होता. त्याच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले. यानंतर सिद्धार्थ अनेक चित्रपटांमध्ये दिसला पण त्याचे चित्रपट चांगला व्यवसाय करू शकले नाहीत. 2021 मध्ये आलेल्या ‘शेरशाह’ मधील त्याच्या जबरदस्त अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होती.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने सांगितले होते की, जेव्हा तो चित्रपटांमध्ये आला तेव्हा त्याला खूप त्रास सहन करावा लागला. त्याने सांगितले की, “मला सुरुवातीला चित्रपटसृष्टी सोडायची होती. पण धैर्य आणि संघर्ष करून मी इथे नाव कमावले.”

आईने चप्पलीने केली होती मारहाण
सिद्धार्थने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याच्या कुटुंबीयांना नेहमीच त्याची काळजी वाटत असते. विशेषत: भविष्यात तो काही करू शकणार नाही, असे वाटणारे त्याचे वडील. सिद्धार्थने सांगितले की, तो लहानपणापासूनच अभ्यासात कमकुवत होता आणि मध्यमवर्गीय कुटुंबात अभ्यासाला खूप महत्त्व दिले जाते. तो नववीत नापास झाला होता, तेव्हा त्याच्या आईने त्याला चप्पलने मारले होते.(sidharth malhotra interesting facts)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
“खोटे गोड बोलण्यापेक्षा कडू सत्य बोला”; केतकीनं चाहत्यांना दिल्या काटेरी शुभेच्छा
हॅपी मंकरसंक्रात! अमृता फडणवीसांनी घेतला पतंग उडवण्याचा आनंद, पाहा भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा