Friday, January 16, 2026
Home बॉलीवूड करण जोहरसोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करून सिद्धार्थने रोवला फिल्म इंडस्ट्रीत पाय

करण जोहरसोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करून सिद्धार्थने रोवला फिल्म इंडस्ट्रीत पाय

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आज आपला ४१वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास दिवशी फिल्मी कलाकारांसह लाखो चाहत्यांनी सोशल मीडियावरून त्यांला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आपल्या १३ वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत सिद्धार्थने डझनभराहून अधिक हिट चित्रपट दिले असून, आज तो बॉलिवूडमधील एक स्थिरावलेला सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. मात्र फार कमी लोकांना माहीत आहे की, अभिनयात येण्याआधी सिद्धार्थने असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही काम केले होते.

सिद्धार्थ मल्होत्राने (Sidharth Malhotra)२०१२ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. करण जोहर यांनीच त्याला लॉन्च केले होते. पण याआधीच सिद्धार्थ आणि करण जोहर यांची ओळख आणि कामाची नाळ जुळलेली होती. सिद्धार्थने करण जोहरच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. या चित्रपटात शाहरुख खान आणि काजोल मुख्य भूमिकेत होते. याच काळात सिद्धार्थ आणि करण यांच्यात मैत्री झाली आणि पुढे करण जोहरने त्याला आपल्या चित्रपटातून लॉन्च करण्याचा निर्णय घेतला. २०१२ मध्ये आलेल्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून सिद्धार्थसोबत वरुण धवन आणि आलिया भट्ट यांनाही लॉन्च करण्यात आले, जे आज बॉलिवूडचे मोठे स्टार्स आहेत.

सिद्धार्थ मल्होत्राचा जन्म १६ जानेवारी १९८५ रोजी दिल्लीमध्ये झाला. आपल्या करिअरमध्ये त्याने अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. यामध्ये रोमँटिक कॉमेडी ‘हंसी तो फंसी’ (२०१४), थ्रिलर ‘एक विलन’ (२०१४) आणि कौटुंबिक ड्रामा ‘कपूर अँड सन्स’ (२०१६) यांचा समावेश आहे. देशभक्तीवर आधारित युद्धपट ‘शेरशाह’ (२०२१) मध्ये दिवंगत कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या भूमिकेसाठी त्याला विशेष प्रशंसा आणि पुरस्कार मिळाले. २०२३ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘मिशन मजनू’ या चित्रपटात रॉ एजंटच्या भूमिकेसाठीही त्याचे कौतुक झाले.

सिद्धार्थने २०२३ साली आपल्या सहकलाकार कियारा आडवाणी हिच्याशी विवाह केला. आज वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर चाहत्यांकडून तसेच अनेक बॉलिवूड कलाकारांकडून सिद्धार्थ मल्होत्रावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

२ तास १९ मिनिटांची ती क्राईम थ्रिलर, ज्याचा प्रत्येक सीन अंगावर आणेल शहारे , IMDb ने दिलीय 7.5 रेटिंग

हे देखील वाचा