Tuesday, June 10, 2025
Home बॉलीवूड ‘सिंघम’, ‘सिंबा’नंतर रोहित शेट्टीच्या आगामी ऍक्शन चित्रपटात दिसणार ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

‘सिंघम’, ‘सिंबा’नंतर रोहित शेट्टीच्या आगामी ऍक्शन चित्रपटात दिसणार ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

बॉलिवूडमध्ये सध्या धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ज्यामधून अनेक दमदार दिग्दर्शकांच्या दिग्दर्शनांची जादू पाहायला मिळत आहे. यामध्ये दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty)  यांचा आणखी एक धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्याची त्यांनी नुकतीच घोषणा केली आहे. चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra)  प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाबद्दल खास पोस्ट करत दिग्दर्शक रोहीत शेट्टीने चाहत्यांना माहिती दिली आहे. प्रेक्षकांना आता या धमाकेदार चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. 

‘सिंघम’, ‘सिम्बा’ आणि ‘सूर्यवंशी’ नंतर, आता रोहित शेट्टी आणखी एका धमाकेदार चित्रपटासह ओटीटी पदार्पणासाठी सज्ज आहे. रोहित शेट्टीने त्याच्या सोशल मीडिया हँडलद्वारे जाहीर केले की त्याने त्याच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रालाची निवड केली आहे. रोहितने एक फोटो देखील शेअर केला ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​ पोलीसाच्या वर्दीत उभा असलेला दिसत आहे.

या लूकमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा खूपच दमदार दिसत आहे. याबाबत सिद्धार्थनेही त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे. रोहित शेट्टीने याबाबतची घोषणा करताना कारवाई उद्यापासून सुरू होईल असा कॅप्शन दिला आहे. त्यामुळे चित्रपटात एक्शनचा धमाका पाहायला मिळणार आहे.

‘शेरशाह’मध्ये सैनिकाची भूमिका करून लोकांची मने जिंकल्यानंतर आता अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. तो रोहित शेट्टीसोबत काम करणार आहे आणि या प्रोजेक्टमधून त्याने त्याची पहिली झलकही दाखवली आहे. या चित्रपटातून  तो पडद्यावर एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच रोहित शेट्टीही ओटीटीवर दमदार पदार्पण करणार  आहे. दरम्यान सिद्धार्थ मल्होत्राने याआधी शेरशाह, मरजावा, इक विलेन चित्रपटांतून आपल्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखविली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सारा खानच्या अतरंगी व्हिडिओने वेधले सोशल मीडियाचे लक्ष, चाहत्यांनी देखील दिल्या अतरंगी प्रतिक्रिया

Happy Wedding Anniversary : पत्रिकेत मंगळ असल्याने ऐश्वर्याचे लावले होते झाडाशी लग्न, अशी जमली ऐश्वर्या- अभिषेकची जोडी

सुनील शेट्टीला लवकरच मिळणार वरबापाचा मान, लेकीच्या लग्नाची केली धुमधडाक्यात तयारी सुरु

हे देखील वाचा