‘शेरशाह’ हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ओटीटी प्लॅटफॉर्मवर १२ ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी अभिनित ‘शेरशाह’ या चित्रपटात शहीद ‘कॅप्टन विक्रम बत्रां’ची जीवनगाथा सांगण्यात आली आहे. अभिनेता सिद्धार्थला त्याच्या अभिनयामुळे या चित्रपटातून प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. त्याने साकारलेली कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका बत्रा कुटुंबीयांना देखील फार आवडली. चित्रपट पाहून बाहेर आल्यावर माध्यमांशी बोलताना त्यांना सिद्धार्थचा अभिनय पाहून अश्रू अनावर झाले.
बत्रा कुटुंबीय म्हणाले, “जसे घडले होते तसेच हुबेहूब दाखवले.” त्यांची ही प्रतिक्रिया सिद्धार्थसाठी खरी शाबासकी ठरली. या चित्रपटामुळे अभिनेता सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. चित्रपट पहिल्यांनंतर सर्वजण अभिनेत्याचे कौतुक करताना दिसत आहेत. या चित्रपटाला मिळालेल्या यशांनंतर आता सिद्धार्थचा आणखी एक कवितेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सिद्धार्थचा हा कवितेचा व्हिडिओ ऍमेझॉन प्राईम व्हिडिओच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या कवितेमध्ये सिद्धार्थने अभिनय करताना साकारलेले ‘कॅप्टन विक्रम बत्रा’ यांच्याबद्दल त्याला काय वाटतं, हे त्याने एका कवितेतून चाहत्यांसमोर सादर केले आहे. ही कविता अतिशय भावुक आणि प्रेरणादायी आहे. या कवितेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मनाला सुन्न करणाऱ्या शब्दांत कॅप्टन बत्रा यांची कामगिरी मांडलेली आहे. त्यामुळे चाहत्यांनी या कवितेवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. (Sidharth Malhotra pays tribute to Captain Vikram batra through poetry)
ही कविता सादर करताना कॅप्टन विक्रम बत्रा यांच्याविषयी बोलत सिद्धार्थने या देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या जवानांना देखील श्रद्धांजली वाहिली आहे. या व्हिडिओला ‘शेरशाह की दास्तान’ असे नाव देण्यात आले आहे. सिद्धार्थची ही भावुक कविता ऐकून त्याचे चाहते देखील भावुक झाले आहेत. कॅप्टन बत्रा यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये लढत असताना ‘ये दिल मांगे मोअर,’ असा उल्लेख केला होता हे देखील सिद्धार्थ या कवितेमध्ये बोलला आहे. आधी एक चित्रपट, चित्रपटाच्या यशांनंतर एक कविता यामुळे सिद्धार्थचे देशावर आणि जवानांवर किती प्रेम आहे, हे समजते.
सिद्धार्थच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीविषयी बोलायचे झाले, तर सिनेसृष्टीमध्ये त्याने २०१० साली पदार्पण केले होते. ‘माय नेम इज खान’ या चित्रपटासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शन केले आहे. त्यानंतर ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटामध्ये त्याने अभिनय केला होता. त्याच्या या अभिनयाला चाहत्यांची भरपूर पसंती मिळाली होती. आपल्या चित्रपटांच्या कारकिर्दीमध्ये त्याने आतापर्यंत नऊ पुरस्कार जिंकले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ
-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर
-बोल्ड आणि डॅशिंग! ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा नवीन लूक आला समोर










