Saturday, June 29, 2024

सिद्धार्थ मल्होत्राने कियारासोबतचा खास फोटो केला शेअर; म्हणाला, ‘तुझ्यासोबतचा प्रवास अतुलनीय आहे…’

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री कियारा तिच्या आगामी चित्रपट ‘शेरशाह’मध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत झळकणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कियारा आणि सिद्धार्थचे अफेअर असल्याची चर्चा मनोरंजन विश्वात धुमाकूळ घालत आहे. अशा परिस्थितीत सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला तिच्या मजेशीर पध्दतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सिद्धार्थने काय लिहिले?
फोटोमध्ये कियाराने बेबी पिंक सलवार सूट परिधान करताना दिसत आहे, तर सिद्धार्थने ब्लू शर्ट घातला आहे. फोटो शेअर करत अभिनेता सिद्धार्थने लिहिले आहे की, “हॅपी बर्थडे कियारा, शेरशाहचा तुझ्यासोबतचा प्रवास अतुलनीय आहे… या चित्रपटाशी अनेक आठवणी जोडलेल्या आहेत… नेहमी आनंदी राहा… खूप प्रेम करा.”

सिद्धार्थ आणि कियाराची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री ताजी आणि शानदार दिसते. त्याच वेळी, प्रत्यक्षात या दोघांचे नाते बर्‍याचदा चर्चेचा विषय ठरले आहे. सिद्धार्थची ही भाषाशैली चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली असुन, ती लोकप्रिय झाली आहे. चाहते सिद्धार्थ आणि कियाराचे जोरदार तोंड भरुन कौतुक करत आहेत.

दरम्यान, सिध्दार्थ आणि कियारा रिलेशनशिप मध्ये असल्याची माहिती खूप दिवसांपासून येत आहेत. मात्र, या दोघांनीही त्यांच्या नात्यावर उघडपणे सर्वांसमोर कबूली दिलेली नाही. कियाराला सिद्धार्थच्या घराबाहेरही अनेकदा स्पॉट केले आहे.

कियारा ‘शेरशाह’ चित्रपटात दिसणार आहे. अलीकडेच ‘शेरशाह’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटात कियारासोबत सिद्धार्थ मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत आहे. तो चित्रपटात विक्रम बत्राची भूमिका साकारत आहे. ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता प्रत्येकजण चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे.

याशिवाय, ‘भूल भुलैया २’मध्ये देखील कियारा आडवाणी ही कार्तिक आर्यनसोबत काम करणार आहे. कोरोनामुळे या चित्रपटाच्या कामाला विलंब झाला आहे. त्याचबरोबर कियाराने काही दिवसांपूर्वी वरुण धवन सोबत ‘जुग जुग जिओ’ या आगामी चित्रपटाचे शूटिंग देखील पूर्ण केले. एवढेच नाही तर कियाराकडे ‘मिस्टर लेले’सारखे मोठे चित्रपटही आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अवघड आहे! ‘ते’ गाणं श्रेया घोषालला पडतंय बरंच महागात, लाखो चाहते करताय ट्रोल

-आर्थिक संकटातून जात आहे ‘बालिका वधू’चे कुटूंब; अभिनेत्रीच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख

-जिममध्ये ‘रफ ऍंड टफ’ वर्कआऊट करताना दिसली उर्वशी रौतेला; सौंदर्यातच नव्हे, तर फिटनेसमध्ये ही देते सर्वांना टक्कर

हे देखील वाचा