Wednesday, July 3, 2024

सिद्धार्थ शुक्लाप्रमाणेच ‘या’ लोकप्रिय कलाकारांनी देखील घेतला कमी वयात याजगाचा निरोप, जाणून घ्या त्यांची नावे

 

मनोरंजन क्षेत्रातून जीवाला चटका लावणारी एक घटना समोर आली आहे. ती म्हणजे ‘बिग बॉस १३’ चा विजेता आणि लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी (२ सप्टेंबर) निधन झाले आहे. वयाच्या केवळ ४० व्या वर्षी त्याची प्राणज्योत मावळली आहे. त्याच्या अभिनयाने त्याने संपूर्ण देशाला त्याच्या प्रेमात पाडले होते. अजूनही कोणाचाच या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये की, सिद्धार्थ या जगात नाहीये. केवळ सिद्धार्थ नव्हे तर चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी अत्यंत कमी वयात या जगाचा निरोप घेतला आहे.

सिद्धार्थ शुक्ला हा टेलिव्हिजनवरील अत्यंत महागडा कलाकार होता. मॉडेलिंगपासून त्याच्या करिअरला सुरुवात केलेल्या सिद्धार्थने खूप कमी वयात त्याचे नाव कमावले आहे. कलर्सवरील ‘बालिका वधू’ या मालिकेने त्याला घराघरात पोहचवले. सिद्धार्थने ‘बिग बॉस १३’ ची ट्रॉफी देखील जिंकली आहे. बिग बॉसच्या इतिहासात तो एक लोकप्रिय स्पर्धक होता हे एका निरीक्षणातून देखील समोर आले होते. सिद्धार्थचे या वयात जाणे ही त्याच्या चाहत्यांसाठी खूप दुःखद घटना आहे. यासोबत असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे अगदी कमी वयात निधन झाले आहे, चला तर मग जाणून घेऊया त्या कलाकारांची यादी.(siddharth shukla and stars who had said goodbye to the world at a very young age)

सुशांत सिंग राजपूत

सिद्धार्थ प्रमाणेच २०२० साली अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूने संपूर्ण देशाला धक्का बसला होता. त्याने त्याच्या घरात पंख्याला लटकून आत्म्यहत्या केली होती. टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत प्रवास करणाऱ्या सुशांतने वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.

इरफान खान

बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका मिरवून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता इरफान खानने २०२० साली या जगाचा निरोप घेतला. इरफान खानचे २९ एप्रिलला मुंबईमधील एका रुग्णालयात निधन झाले. जवळपास दिड वर्ष तो आजाराशी झुंज देत होता. अखेर वयाच्या ५४ व्या वर्षी त्याने हार पत्करली आणि शेवटचा श्वास घेतला.

वाजिद खान

दिग्गज संगीतकार वाजिद खान हा अनेक वर्ष किडनीच्या आजाराशी झुंज देत होता. किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्याची तब्येत बिघडली आणि त्याला मुंबईमधील एका रुग्णालयात ऍडमिट केले होते. वाजिदने वयाच्या ४२ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला आहे.

सौंदर्या

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री जिने कमी वयात तिचे नाव कमावले होते ती म्हणेज सौंदर्या. तिने देखील खूप कमी वयात या जगाचा निरोप घेतला आहे. तिने बॉलिवूडसोबत कन्नड, तामिळ आणि मल्याळम चित्रपटात देखील काम केले आहे. बॉलिवूडमधील ‘सूर्यवंशम’ या चित्रपटातून तिला खूप ओळख मिळाली. परंतु वयाच्या २८ व्या वर्षी एअरक्राफ्ट क्रॅश झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला.

प्रत्यूषा बॅनर्जी

कलर्सवरील लोकप्रिय मालिका ‘बालिका वधू’ मधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जी हिने वयाच्या केवळ २४ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला आहे. तिने घरात पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. प्रत्यूषा आणि सिद्धार्थ हे दोघेही ‘बालिका वधू’ मालिकेत मुख्य भूमिकेत होते.

गगन कांग

टेलिव्हिजनवरील ‘महाकाली : अंत ही आरंभ है’ या मालिकेत देवराज इंद्राची भूमिका साकारणारा अभिनेता गगन कांग याचे वयाच्या २८ व्या वर्षी मृत्यू झाला होता. गगन शूटिंग संपवून घरी जात होता तेव्हा त्याच्या कारचा अपघात झाला आणि त्या अपघातात त्याचा मृत्यू झाला होता.

कुलजीत रंधावा

टेलिव्हिजनवरील ‘कुमकुम’, ‘कुसुम’, ‘हिप हिप हुर्रे’, ‘रिश्ते’, ‘क्यो होता है प्यार’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री हिने वयाच्या ३० व्या वर्षी आत्म्यहत्या केली होती. प्रेमात धोका मिळाल्यामुळे २००६ मध्ये तिने आत्महत्या केली.

संजीत बेदी

‘संजीवनी : अ मेडिकल बून’ या मालिकेत डॉक्टर ओमीचे पात्र निभावून लोकांच्या मनात खास जागा निर्माण करणारा संजीत बेदी याचा मृत्यू देखील खूप कमी वयात झाला आहे. २०१५ साली ब्रेन एलमेंट नावाच्या एका आजाराने ४० व्या वर्षी त्याचे निधन झाले.

 

अबीर गोस्वामी

‘कुसुम’, ‘कुमकुम’ या मालिकांमध्ये काम करणारा अबीर गोस्वामी याचा वयाच्या ३८ व्या वर्षी हृद्य विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. जिम करत असताना त्याला झटका आला आणि त्याने या जगाचा निरोप घेतला.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिग ब्रेकिंग! सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?

सिद्धार्थ शुक्लाची चटका लावणारी एक्झिट; मॉडेलिंगने मिळाली होती आयुष्याला कलाटणी, जाणून घ्या त्याचा प्रवास

संपुर्ण यादी: बीग बॉसचे आजपर्यंतचे सर्व विजेते; शो नंतर चमकले भाग्य, जीवनात झाले यशस्वी

हे देखील वाचा