Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांनी नोंदवला एडीआर, डॉक्टरांनी ‘या’ मृत्यूची वर्तवली शक्यता

‘बिग बॉस १३’चा विजेता आणि बॉलिवूड, टेलिव्हिजन अभिनेता असणाऱ्या सिद्धार्थ शुक्लाचे २ सप्टेंबर रोजी मुंबईत निधन झाले. अजूनही त्याच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही कोणीच सावरले नाहीये. मात्र यासर्वांमधे पोलिसांना आणि त्याच्या फॅन्सला प्रश्न पडला होता की, सिद्धार्थचे अचानक निधन झाले कसे? दरम्यान मीडियामध्ये त्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याच्या बातम्या येत होत्या. पोलिसांना देखील सिद्धार्थच्या मृत्यूबाबत संशय आल्याने त्यांनी त्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सिद्धार्थच्या मृत्यप्रकारणी एडीआर रिपोर्ट नोंदवला आहे.

अहवालावर विश्वास ठेवला गेला तर कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सिद्धार्थच्या मृत्यूमध्ये कोणतीही संशयास्पद गोष्ट नसल्याचे सांगितले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सिद्धार्थचा मृत्यू नैसर्गिक मृत्यूच आहे. मात्र, मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतु अधिक विश्लेषणावरून ते लवकरच स्पष्ट होईल. जर सिद्धार्थला हृदयविकाराचा झटका आल्याचे अहवालात सिद्ध झाले तर मुंबई पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास थांबतील. कोणत्याही मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यापूर्वी एडीआर दाखल करणे कायद्याने अनिवार्य आहे. याशिवाय पोलीस लवकरच सिद्धार्थच्या कुटुंबीयांचे स्टेटमेंट घेणार आहेत.

सिद्धार्थवर शुक्रवारी (३सप्टेंबर) ‘ब्रह्मकुमारी’ प्रथेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धार्थचा लहानपणापासून या संस्थेशी संबंध होता. सिद्धार्थला अंतिम निरोप देण्यासाठी कलाकार, त्याचे मित्र, आणि असंख्य फॅन्स उपस्थित होते. सिद्धार्थच्या आईने त्याच्या मुलाचे अंतिम संस्कार केले.

सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी वार्‍यासारखी सर्वत्र पसरली. वयाच्या केवळ ४० व्या वर्षी त्याने या जगाचा निरोप घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सिद्धार्थने आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात २००८ पासून केली, तो ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’ या मालिकेद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आला. याशिवाय त्याने ‘बिग बॉस १३’ची ट्रॉफीही जिंकली.

माध्यमातील वृत्तानुसार, शहनाझ गिल आणि सिद्धार्थ हे दोघेही नात्यात होते. त्या दोघांनी त्याचं पुढील आयुष्य एकत्र घालवायचा निर्णय घेत येत्या डिसेंबर २०२१ मध्ये विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ

-देशाबाहेरही व्यक्त केला जातोय सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचा शोक; जॉन सीनाने वाहिली अभिनेत्याला श्रद्धांजली

-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…

हे देखील वाचा