सिद्धार्थ शुक्लाने मनोरंजन क्षेत्रात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले होते. सिद्धार्थचा खूप मोठा चाहता वर्ग होता. त्याच्या अचानक निधनामुळे त्याच्या परिवाराला, चाहत्यावर्गाला फार मोठा धक्का बसला होता. मालिका क्षेत्रातून पदार्पण केलेला अभिनेता त्याने सिनेमा क्षेत्रात देखील स्वतःचे स्थान निर्माण केले. त्याचे आकस्मिक निधन झाले, तरी देखील तो आपल्या चाहत्या वर्गांच्या मनात घर करून आहे. सिद्धार्थच्या परिवाराने मंगळवारी (२५ जानेवारी) रोजी असे आवाहन केले की, “सिद्धार्थ शुक्लाचे नाव यापुढे कोणत्याही ठिकाणी वापरायचे असल्यास पहिल्यांदा आम्हाला विचारण्यात यावे ही विनंती.”
शहनाज गिल (shehnaaz gill) आणि सिद्धार्थ शुक्ला (sidharth shukla) यांची जोडी ‘बिग बॉस’ या शोमधून सगळ्यांच्याच पसंतीस पडली होती. सिद्धार्थ शुक्लाच्या परिवाराने हे वक्तव्य केल्यानंतर शहनाज गिलने देखील आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले.
सिद्धार्थ शुक्लाचा परिवार वक्तव्य करताना फार भावुक झाला. ते म्हणाले की ” सिद्धार्थ आपल्यात नाही, परंतु त्याच्या आठवणी आपल्याबरोबर अजूनही ताज्या आहेत. त्याने आत्तापर्यंत स्वतःचे केलेले नाव स्वतः मिळवलेला सन्मान याचा आदर ठेवून यापुढे सिद्धार्थ शुक्लाचे नाव कोणत्याही कार्यक्रमात, मालिकेत, सिनेमात किंवा कोठेही वापरण्याआधी आमच्या परिवाराकडून अनुमती घ्यावी विनंती. आम्ही या केलेल्या वक्तव्याचा सन्मान करावा. त्याच्या नावाचा त्याच्या चेहऱ्याचा वापर करण्याआधी सिद्धार्थचे नाव वापरण्याआधी त्यांनी आम्हाला संपर्क करावा.”
सिद्धार्थ आठवणीत भावुक होत ते म्हणाले की, “काही योजना या अजून प्रेक्षकांसमोर आल्या नाहीत याचा मुख्य कारण योजनेला सिद्धार्थ शुक्लाची अनुमती नव्हती. आम्ही देखील त्याला आवडणारी गोष्ट लोकांसमोर यावी यासाठी जास्त प्रयत्न करू. यासाठीच त्याच्या अपरोक्ष त्याचे नाव त्याचा चेहरा कोणी वापरू नये त्याचा गैरफायदा घेऊ नये त्यासाठी आम्ही ही विनंती करत आहोत.” सिद्धार्थला २ सप्टेंबर २०२१ रोजी हृदय विकाराच्या झटका आल्याने निधन झालं. त्याच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. शहनाझ तर अगदी सदम्यात गेली होती. तिचे करिअर, शूटिंग या सगळ्यापासून ती अगदी दूर गेली होती. आता कुठे तिचे आयुष्य पूर्वपदावर आले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
नुसरत भारुचाचा शॉर्ट ड्रेसमध्ये हटके अंदाज, सोशल मीडियावर अभिनेत्रीच्याच चर्चांना उधान
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या लोकप्रियतेचा असा घेतला जातोय फायदा? कुटूंबाकडून करण्यात आली ‘ही’ विनंती