Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

सिद्धार्थ शुक्लाच्या कुटूंबाकडून जारी करण्यात आले निवेदन; मुंबई पोलिसांचे आभार मानत, लोकांना केली ‘ही’ विनंती

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे २ सप्टेंबर रोजी आकस्मिक निधन झाले. त्याच्या निधनाने त्याच्या कुटुंबासह त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. हसता-खेळता सिद्धार्थ आज आपल्यात नाही, यावर अजून ही लोकांचा विश्वास बसत नाही. त्याचे कुटुंब, मित्र आणि संपूर्ण इंडस्ट्रीला त्यांची कमतरता जाणवू लागली आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर चार दिवसांनी त्याच्या कुटुंबाने आता एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये त्यांनी लोकांना विनंती केली आहे की, त्याच्या कुटुंबाला एकटे सोडून त्यांना शोक करू द्या.

कुटुंबाने जारी केले निवेदन
सिद्धार्थच्या कुटुंबीयांच्या वतीने निवेदन जारी करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, “सिद्धार्थच्या प्रवासाचा एक भाग बनण्यासाठी आणि त्याला खूप प्रेम दिल्याबद्दल सर्वांचे आभार. नक्कीच सर्व काही इथेच संपत नाही, तो नेहमी आमच्या हृदयात राहील. सिद्धार्थने नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्याला महत्त्व दिले. म्हणून, आम्ही आपणा सर्वांना विनंती करतो की, आमच्या कुटुंबाला शोक करण्यासाठी एकटं राहू द्या.” (Actor Siddharth Shukla’s family thanked Mumbai Police and also requested the people)

मुंबई पोलिसांचेही मानले आभार
सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांचेही त्यांच्या निवेदनात आभार मानले आहे. त्यांनी लिहिले की, “संवेदनशीलता आणि सहानुभूतीबद्दल मुंबई पोलीस दलाचे विशेष आभार. त्या दिवशी ते प्रत्येक क्षणी आमच्यासोबत उभे राहिले आणि ढालीप्रमाणे आमचे संरक्षण करत राहिले. कृपया त्याला तुमच्या मनात आणि प्रार्थनेत नेहमी लक्षात ठेवा. ओम शांती”

मनोरंजन विश्वात पसरली शोककळा
सिद्धार्थ शुक्लाच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण मनोरंजन जग हादरून गेले आहे. केवळ टीव्ही कलाकारच नव्हे, तर बॉलिवूड कलाकारांनीही सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली. सोमवारी म्हणजेच ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रार्थना सभेचे आयोजन केले गेले. या शोकसभेचे आयोजन सिद्धार्थच्या आई आणि बहिणी आणि ब्रह्माकुमारी समाज यांनी केले. चाहत्यांनाही झूम लिंकद्वारे यात सहभागी होता येत होते.

पूर्णपणे खचलीय शहनाझ
सिद्धार्थ आणि शहनाझ हे टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही ‘बिग बॉस १३’ च्या मंचावर भेटले होते. दोघे घरात मित्र बनले आणि नंतर प्रेक्षकांना त्यांच्यातील एक अतिशय प्रेमळ नाते पाहायला मिळाले. या जोडीला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही दोघांचे नाते अधिक घट्ट झाले. माध्यमांतील वृत्तानुसार, हे दोघे डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधणार होते. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाझ पूर्णपणे खचली आहे. तिचे वडील म्हणतात की, “शहनाझ वारंवार म्हणत आहे की, ती आता कशी जगेल.”

‘बालिका वधू’ने दिली लोकप्रियता
सिद्धार्थ शुक्लाने ‘बालिका वधू’ या मालिकेत शिवाचे पात्र साकारून लोकप्रियता मिळवली. त्याचबरोबर, ‘बिग बॉस १३’मध्ये त्याने आपल्या विनोदबुद्धीने, कॉमिक टाइमिंग आणि  बोलण्याने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. यामुळेच तो शोचा विजेता बनला. या शोमध्ये त्याची भेट शहनाझ गिलशी झाली. बिग बॉसपासून सिद्धार्थकडे अनेक मोठे प्रोजेक्ट होते ज्यात तो काम करणार होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नवा ट्विस्ट? लतिका म्हणतेय, ‘तुम्ही दोघांनी मिळून माझा जीव…’; तर अभिमन्यू अन् नंदिताने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

-सुंदर अन् सोज्वळ! पांढऱ्या ड्रेसमध्ये पाहायला मिळालं रुपाली भोसलचं ‘आकर्षक’ सौंदर्य

-‘पलट’ म्हणणाऱ्या ऋतुजाच्या सौंदर्याची चाहत्याला पडली भुरळ, ‘तुझ्या सौंदर्याला सीमा नाही’ म्हणत केलं कौतुक

हे देखील वाचा