Wednesday, July 3, 2024

‘ब्रोकन बट ब्युटीफुल!’ सिद्धार्थ शुक्लाच्या किसिंग सीनला चाहत्यांची पसंती; मात्र शहनाजचे चाहते झाले निराश

‘बिग बॉस 13’ मध्ये सिद्धार्थ शुक्लाला पाहिले गेले होते. बिग बॉसच्या 13 व्या सिझनच्या फायनलमध्ये पोहोचून सिद्धार्थ शोचा विजेता ठरला होता. शोच्या वेळीच अभिनेत्याची फॅन फॉलोविंग जबरदस्त वाढली. शोमध्ये सिद्धार्थने त्याची प्रत्येक बाजू चाहत्यांसमोर सादर केली होती. शोचा विजेता झाल्यानंतर अभिनेता काही व्हिडिओंमध्येही दिसला. आता तो लवकरच वेबसीरिजच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवरही पदार्पण करणार आहे.

सिद्धार्थ शुक्ला सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो चाहत्यांना दररोज स्वतःशी संबंधित माहिती देत राहतो. अलीकडेच अभिनेत्याने सांगितले होते की, लवकरच तो ‘ब्रोकन बट ब्युटीफुल 3’ मध्ये दिसणार आहे. आता या सीरिजमधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सिद्धार्थ लवकरच ‘ब्रोकन बट ब्युटीफुल सीझन 3’ मध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये सिद्धार्थने अभिनेत्री सोनिया राठीसोबत इंटिमेट किसिंग सीन दिला आहे. आता त्या सीनचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते सिद्धार्थसाठी कौतुकाचे पूल बांधत आहेत. त्याचवेळी दुसरीकडे शहनाज गिलच्या चाहत्यांना त्याचा हा ट्रेंड अजिबात आवडला नाही.

‘ब्रोकन बट ब्युटीफुल 3’ ची निर्मिती देखील एकता कपूरने केली आहे. या सीरिजमध्ये सिद्धार्थ शुक्ला अगस्तया रावच्या दमदार भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच एकता कपूरनेदेखील या शोचे काही पूर्वावलोकन व्हिडिओ शेअर केले होते, जे पाहून सिद्धार्थ शुक्लाच्या चाहत्यांचा आनंद गगनाला भिडला. या शोचा टायटल ट्रॅकदेखील जारी करण्यात आला आहे.

व्हायरल होत असलेल्या किसिंग व्हिडिओमध्ये या दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. व्हिडिओ पाहून चाहते सिद्धार्थसाठी पुन्हा वेडे होताना दिसत आहेत. चाहते त्यांच्या स्टाईलमध्ये सिद्धार्थचे कौतुक करताना दिसत आहेत. एकाने लिहिले, “मला तुझा अभिमान आहे सिद्धार्थ शुक्ला.”

‘ब्रोकन बट ब्युटीफुल 3’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ होणार आहे. या सीरिजच्या पहिल्या आणि दुसर्‍या सीझनमध्ये विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत होता. विक्रांतची कहाणी सीझन 2 मध्ये संपली. आता मालिकेत नवीन कथेला सुरुवात होईल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फॅन असावी तर अशी! लहानग्या चाहतीकडून राखी सावंतला १.५ लाख रुपयांचं गिफ्ट; अभिनेत्रीही झाली भलतीच खुश

-घरात शिरलेल्या गोरिलाला बाहेर काढण्याऐवजी श्रद्धा कपूरने लावले त्याच्यासोबत जोरदार ठुमके, पाहा मजेशीर व्हिडिओ

-व्हिडिओ: दिया मिर्झाने केला सावत्र मुलीचा वाढदिवस साजरा, वैभव रेखीच्या एक्स वाईफनेही लावली हजेरी

हे देखील वाचा