टीव्ही इंडस्ट्रीमधला हँडसम हंक अभिनेता सिद्धार्थ शुक्ला ओळखला जातो. सिद्धार्थने टेलिव्हिजनवर अनेक मालिकांमधून अभिनय करत प्रेक्षकांच्या मनामध्ये एक स्थान निर्माण केले आहे. सिद्धार्थने त्याच्या लूक्सवर खूप मेहनत घेतली आहे. प्रत्येक तरुणीच्या स्वप्नातल्या हिरो सारखा टॉल, डार्क, हँडसम असणाऱ्या सिद्धार्थने खूपच कमी वेळात त्याचा एक चाहता वर्ग तयार केला आहे. २०१९ साली सिद्धार्थने बिग बॉसचा ‘किताब देखील आपल्या नावावर केला आणि याचमुळे त्याच्या लोकप्रियतेत अधिक भर पडली.
सिद्धार्थ सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असणारा कलाकार आहे. नेहमी तो त्याच्या पोस्टमुळे, कामामुळे, नवनवीन प्रोजेक्ट्समुळे चर्चेत असतो. नुकताच त्याने त्याचा एक जबरदस्त व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडिओमधला सिद्धार्थचा हॉट आणि शर्टलेस लुक तुफान भाव खात आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्याने लिहिले, ” कधी कधी चिल करणे देखील खूप आवश्यक आहे.”
या व्हिडिओत सिद्धार्थ शर्टलेस होऊन स्विमिंग पूलमध्ये उडी मारताना दिसत आहे. त्याचा हा स्लो मोशनमधला व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, यावर फॅन्सच्या भन्नाट कमेंट्स येत आहेत. त्याचा हा व्हिडिओ फिमेल फॅन्समध्ये खूप जास्त लोकप्रिय झाला आहे.
सिद्धार्थने २०१९ साली बिग बॉसचे विजेतेपद मिळवले. त्यानंतर त्याच्या आणि शेहनाज गिलच्या जोडीला खूप पसंती मिळाली. या शो नंतर देखील या दोघांनी अनेक अल्बममध्ये सोबत काम केले. फॅन्सने तर त्यांना ‘सिडनाज’ हे नाव देखील दिले.
२००५ साली सिद्धार्थने ४० स्पर्धकांना हरवत बेस्ट मॉडेलचा प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर २००८ साली त्याने त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. सिद्धार्थला खरी प्रसिद्धी आणि लोकप्रियता ‘बालिका वधू’ मधून मिळाली. सिद्धार्थने ‘हमटी शर्मा की दुल्हनिया’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. लवकरच तो ब्रोकन बट ब्यूटीफुल या वेबसिरीजच्या ३ सिजनमध्ये दिसणार आहे.










