Wednesday, July 3, 2024

‘बिग बॉस’चा माजी कंटेस्टेंट सिद्धार्थ शुक्लाने साधला पाकिस्तानी पंतप्रधानांच्या वक्तव्यावर निशाणा, म्हणाला ‘वा रे वा…’

‘बिग बॉस 13’ चा विजेता सिद्धार्थ शुक्ला त्याच्या अनेक वक्तव्यामुळे सगळीकडे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमी सोशल मीडियावर‌ समाजातील गोष्टींवर त्याचे मत मांडताना दिसत असतो. नुकताच त्याने ‌न्यूयॉर्क टाईम्सच्या एका ट्विटवर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देऊन आक्षेप नोंदवले आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी असे सांगितले होते की, “प्रत्येक व्यक्तीकडे विल‌‌ पावर असतेच असे नाही. जर तुम्ही या समाजात अश्लीलता पसरवण्याचा प्रयत्न करत असाल, तर नक्कीच त्याचा वाईट परिणाम आपल्या समाजावर होणार आहे.”

त्यांच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना सिद्धार्थ शुक्लाने असे लिहिले की, “वा रे वा दुनिया ज्या पुरुषांमध्ये विलपावर कमी आहे. तुम्ही त्यांना नपुंसक का नाही जाहीर करत.”

सिद्धार्थ नेहमीच लिंग समानतेवर भाष्य करताना दिसत असतो. सिद्धार्थ शुक्लाने सांगितलेली ही गोष्ट अनेकांना कटू सत्य आहे, असे वाटत आहे. एका व्यक्तीने इमरान खान यांचा बचाव करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. त्यांनी असे सांगितले की, ‘इमरान खान यांनी बोललेल्या वाक्याला चुकीच्या पद्धतीने घेत आहेत.’

यावर सिद्धार्थ शुक्ला याने असे उत्तर दिले की, “असे असेल तरी चांगलीच गोष्ट आहे जर ही गोष्ट खरी असेल, तर त्यांनी न्यूयार्क टाईम्सवर मानहानीचा दावा ठोकला पाहिजे. असं बोलले नसतील तरीही खूप चुकीची गोष्ट आहे त्यांची आणि त्यांच्या देशाची प्रतिमा खराब करत आहे.” सिद्धार्थ शुक्लाच्या चाहत्यांनी त्यांच्या या वक्तव्याला प्रोत्साहन दिले.

सिद्धार्थ शुक्ला हा बिग बॉस 13 चा विजेता आहे. तसेच त्याने अनेक व्हिडिओ देखील बनवले आहे. तसेच तो बिग बॉस 14 मध्ये देखील निदर्शनास आला होता. सिद्धार्थ शुक्ला आणि सलमान खान यांना एकत्र स्पॉट केले आहे. ते दोघेही एका डिजिटल प्रोजेक्टवर काम करत असल्याची चर्चा सर्वत्र झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘माझ्याकडे ब्राची जोडी आहे, पत्ता सांगा…’, अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोवर युजरची विचित्र कमेंट, तिनेही ‘अशी’ केली बोलती बंद

-‘तू श्रीदेवीचे नाव खराब करत आहे’, जान्हवी कपूरने हॉट फोट शेअर करताच नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल

-लाखात एक भेट! पती डॅनियलकडून लग्नाच्या १० व्या वाढदिवशी सनी लिओनीला खास गिफ्ट, पाहून तुम्हीही व्हाल अचंबित

हे देखील वाचा