Friday, July 5, 2024

सिद्धार्थ शुक्लाचा ‘हा’ व्हिडिओ बघितलाय का?आईसोबतचे प्रेमळ क्षण पाहून पाणावतील तुमचेही डोळे

टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे केवळ त्याचे जवळचे नातेवाईकच दुखावले गेले नाहीत, तर संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. सिध्दार्थच्या अचानक झालेल्या निधनामुळे बरेच लोक तुटले आहेत. त्याचे मित्र आणि नातेवाईक त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी सतत प्रार्थना करत आहेत. सिद्धार्थचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्याच्या आईसोबत घालवलेल्या त्याच्या प्रेमळ क्षणांचा आहे, जे पाहून तुम्हीही भावुक व्हाल.

सिद्धार्थचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही नक्कीच भावनिक व्हाल, पण हा व्हिडिओ तुमच्या हृदयालाही मोठा दिलासा देईल. या व्हिडिओमध्ये आपण आई रीता शुक्ला आणि सिद्धार्थचे बॉण्डिंग स्पष्टपणे पाहू शकतो. दोघांमधील असणारे प्रचंड प्रेम यात दिसत आहे. तसेच तुम्हाला कळेल की, सिद्धार्थ किती मनमोकळे आणि मजेशीर आयुष्य जगत होता‌. तो आयुष्यातील प्रत्येक क्षण एन्जॉय करत होता.

या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ पार्कींगमध्ये झोका खेळताना दिसत आहे. त्याच्यासोबत त्याची आईसुद्धा झोका खेळत आहे. दोघेही या क्षणाचा खूप आनंद घेत आहेत. दरम्यान, सिद्धार्थच्या चाहत्याने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. सिद्धार्थ नेहमी त्याच्या आईच्या खूप जवळ राहायचा. तसेच अनेकदा धिंगाणा घालत असायचा. व्हिडिओ पाहिल्यानंतर सिद्धार्थचे चाहते खूप भावुक झाले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर कळते की, सिद्धार्थ मोठा झाल्यानंतरही, त्याने आपल्या आतील लहान मुलाला जिवंत ठेवले होते. तो नेहमीच लहान मुलांसारखा वागायचा.

दरम्यान, लोकप्रिय टीव्ही आणि ‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी (२ सप्टेंबर) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रपरिवाराने त्याला अखेरचा निरोप दिला. सिद्धार्थ ४० वर्षांचा होता. त्याच्या कुटुंबात त्याची आई आणि दोन बहिणी आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ

-देशाबाहेरही व्यक्त केला जातोय सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचा शोक; जॉन सीनाने वाहिली अभिनेत्याला श्रद्धांजली

-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…

हे देखील वाचा