Tuesday, July 9, 2024

गली बॉय फेम सिद्धांत चतुर्वेदीची कोरोना काळात रस्त्यावरुन जाणाऱ्या एँब्युलन्सवर ह्रदयदावक कविता, ऐका थोडक्यात

भारतात कोरोना महामारीचे संकट वाढत आहे. अनेकांचे प्राण देखील जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः तुफान आले आहे. दर दिवशी लाखोंमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. अश्यातच अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. नागरिकांना त्यांच्या घरातच राहण्याचे आदेश दिले जात आहे. कारण या विषाणूचे संक्रमण वेगाने होताना दिसत आहे. यात अनेक बॉलिवूड कलाकारांचा देखील मृत्यू झाला आहे. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याने एक कविता लिहून ती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सिद्धांत चतुर्वेदीने ही कविता त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केली आहे. त्याने एक पोस्ट शेअर करत कॅप्शन दिले आहे की, विचार आला की ,शेअर करावी एक जवळून जाणारी एंबुलेन्स.

कविता अशी आहे की, “खिडकी पर बैठते ही आज फिर गुजरती हैं एंबुलेन्स कि आवाजे। हर सेकंड जैसे कोई अपना आखिरी सास ले रहा हो। दिलं थोडा सहम हो जाता है, कही वो गुजरता इंसान कोई अपना ना हो।” सिद्धांत चतुर्वेदीच्या कवितेच्या या ओळी सध्या चालू असलेल्या परिस्थितीवर त्याने लिहल्या आहे. ज्या आज प्रत्येकाला पटल्या आहेत. त्याच्या अनेक चाहत्यांसोबत अनेक बॉलिवूड कलाकार देखील त्याच्या या कवितेला प्रतिक्रिया देत,त्याचे कौतुक करत आहेत.

अभिनेत्री दिया मिर्झाने त्याच्या या कवितेला प्रतिक्रिया देत ‘लव्ह यू’ अशी कमेंट केली आहे. तर क्रिती सेननने ‘ब्युटीफुल’ अशी कमेंट केली आहे. त्याने शेअर केलेल्या या पोस्टला आतापर्यंत दोन लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहे.

सिद्धांतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 2017 पासून 2019 पर्यंत प्राईम व्हिडिओ वेबसीरिज ‘इन साईड एज’ मध्ये काम केले आहे. त्यानंतर त्याने ‘गल्ली बॉय’ या चित्रपटात एका स्ट्रीट रॅपरची भूमिका निभावली आहे.

हे देखील वाचा