Friday, July 5, 2024

सिद्धु मुसेवालाच्या ३ मारेकऱ्यांची ओळख पटली, गोल्डी बरार विरोधातही निघणार रेड कॉर्नर नोटीस

पंजाबी गायक आणि कॉंग्रेस नेता सिद्धु मूसेवालाच्या (Siddhu Moosewala) हत्येने देशभरात चांगलाच खळबळ माजली आहे. सिद्धु मूसेवालावर भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. सुरक्षा हटवल्यानंतर एकाच दिवसात झालेल्या हत्येमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळेच पोलिसांपुढे या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आव्हान उभे होते. यावर आता नवी माहिती समोर आली असून घटनेचा तपास करणारी मानसा पोलिस दिल्लीमधील तिहार तुरूंगात असलेल्या गॅँगस्टर लोरेन्स बिश्नोइची रिमांड घेऊन  चौकशी करणार आहे. त्याचबरोबर कॅनडामधील डॉन गोल्डी बरारविरोधात ही रेड कॉर्नर नोटिस पाठवणार आहे. गोल्डीने या हत्येची जबाबदारी घेतली आहे. 

या संपूर्ण प्रकरणात पंजाब पोलिसांनी क्रेंद्रिय तपास यंत्रणांचीही मदत मागितली आहे. त्याचबरोबर या हत्याकांडात एकूण ६-७ जण सहभागी होते. असेही म्हणले आहे. यामधील तिघांची ओळख पटली असून या हत्येचा तपास करणाऱ्या टीमला अनेक महत्वाचे पुरावे सापडल्याचेही सांगण्यात आले आहे. याबाबत बोलताना एसपी गौरव तुरा यांनी सांगितले की, पुराव्यावरुन आरोपींना रिमांडमध्ये घेण्यात आले असून यामधील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या संपूर्ण हत्याकांडाचा शोध लागणार असून यापाठीमागे मोठ्या गॅंगचा हात असल्याचेही त्यांनी म्हणले आहे.

दरम्यान लॉरेंन्स बिश्नोईने दिल्ली पोलिसांकडे सुरक्षा वाढवण्यासाठी केलेली मागणीही मागे घेतली आहे. या मागणीनुसार लॉरेन्सने पंजाब पोलिसांच्या चौकशीचे आणि जिवाला धोका असल्याचे कारण सांगत न्यायालयाकडे अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याचे आवाहन केले होते. पण आता त्यांच्या वकीलांनी हा अर्ज मागे घेत पंजाब किंवा हरियाणा हाय कोर्टात याबद्दल अर्ज करणार असल्याचे सांगितले होते.

 

हे देखील वाचा