Tuesday, July 9, 2024

करोडोंच्या गाड्यांचा ताफा, एका गाण्याचे लाखो रुपये, इतक्या कोटीचा मालक होता सिद्धु मूसेवाला

पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला (sidhu moose wala) यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मानसा जिल्ह्यात झालेल्या गोळीबारात २८ वर्षीय गायकाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या सिद्धुने अनेक धमाकेदार गाणी गायली आहेत.या प्रतिभावान कलाकाराचा झालेला असा धक्कादायक मृत्यू प्रत्येकालाच धक्का देऊन गेला. सिद्धू मुसेवालाचे नाव अनेकदा वादात सापडले होते. गायकाला नेहमीच आलिशान जीवनशैलीची आवड होती. एका गाण्यासाठी लाखो रुपये घेणाऱ्या या गायकाकडे करोडोंच्या संपत्तीपासून ते आलिशान वाहनांपर्यंतचे कलेक्शन होते. जाणून घेऊया त्याच्या एकूण संपत्तीबद्दल. 

प्रसिद्ध गायक सिद्धु मूसावालाच्या हत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. आपल्या दमदार गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेला सिद्धु त्याच्या लक्झरी लाइफस्टाईलसाठी चांगलाच प्रसिद्ध होता. सिद्धू मुसेवाला नेहमीच कारचे शौकीन होता. त्याच्याकडे आलिशान कारसह महागड्या बाइक्सचा संग्रह होता. रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे 2.43 कोटींची मर्सिडीज AMG 63 कार होती. याशिवाय त्याच्याकडे टोयोटा फॉर्च्युनर, जीप, इसुझू डी-मॅक्स, रेंज रोव्हर आणि मस्टँग ही वाहने होती. सिद्धूच्या बाईक कलेक्शनमध्ये रॉयल एनफिल्ड बुलेटचाही समावेश होता.

रिपोर्ट्सनुसार, सिद्धुची एकूण संपत्ती 30 कोटी होती. तो त्याच्या एका स्टेज शोसाठी 18 लाख रुपये घेत असे. यासोबतच त्याने अनेक मालमत्तांमध्येही गुंतवणूक केली होती. सिद्धुकडे वाहनांव्यतिरिक्त अनेक दागिने आणि रोख रक्कम होती. नुकतीच त्याने कॉंग्रेस पक्षाकडून निवडणुकही लढवली होती. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्याच्याकडे 5 लाख रुपये रोख, 5 कोटी रुपयांच्या बँक ठेवी आणि दागिने आणि 18 लाख रुपयांची जमीन यासह 8 कोटी रुपयांची मालमत्ता होती.

रविवारी म्हणजेच २९ मे रोजी सिद्धु मूसावालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्धू मुसेवाला यांनी यंदा काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. रिपोर्ट्सनुसार, हत्येच्या एक दिवस आधी त्याची सुरक्षा कमी करण्यात आली होती. त्याच्याकडे पूर्वी 10 बंदूकधारी होते, पण मान सरकारने ही संख्या कमी केली. पंजाब पोलिसांनी गायकाच्या हत्येप्रकरणी कॅनडास्थित गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नई यांची नावे दिली आहेत.

हे देखील वाचा