Friday, July 5, 2024

आजही कायम आहे सिद्धू मुसेवालाचा चार्म, ‘मेरे ना’ गाणे प्रदर्शित होताच काही मिनिटात मिळाले मिलियन व्ह्यूज

लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची गाणी नेहमीच त्याच्या चाहत्यांना भुरळ घालतात. आज जरी सिद्धू या जगात नसला तरी त्याची गाणी मात्र त्याच्या फॅन्सचे आजही मनोरंजन करत आहे. यातच आता सिद्धू मूसेवालाचे नवीन एक ‘मेरे ना’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. सिद्धूची हत्या होण्याआधी त्याने अनेक गाणी रेकॉर्ड केली होती. त्यातलेच ‘मेरे ना’ हे गाणे आता प्रदर्शित झाले आहे. आज सिद्धू नसला तरी त्याची गाणी तो असल्याची जाणीव करून देतात. नुकतेच प्रदर्शित झालेल्या ‘मेरे ना’ या गाण्याला ग्रॅमी अवॉर्ड विजेता नायजेरियन रॅपर बरना बॉयने देखील त्याचा आवाज दिला आहे.

सिद्धू मुसेवालाच्या या नवीन गाण्याला लोकांची आणि त्याच्या फॅन्सची चांगलीच पसंती मिळत आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धूच्या काही जुन्या व्हिडिओचा वापर केला आहे. तर काही ठिकाणी ग्राफिक्सचा वापर करत लिपसिंग केली आहे. सिद्धूच्या या नवीन गाण्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिद्धूच्या निधनानंतर त्याचे हे तिसरे गाणे प्रदर्शित झाले आहे. याआधी त्याचे दोन गाणे प्रदर्शित झाले आहेत. त्यांना देखील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.

सिद्धू मुसेवालाची तगडी फॅन फॉलोविंग असून, त्याचे गाणे लोकांना तुफान आवडतात. त्याच्या निधनानंतरही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. त्याच्या ‘मेरे ना’ गाण्याला देखील जोरदार प्रतिसाद लोकं देत आहे. गाणे प्रदर्शित झाल्यानंतर केवळ १० मिनिटेच गाण्याला १ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

दरम्यान मागच्यावर्षी २०२२ साली सिद्धू मुसेवालाची गोळ्या घालून भर रस्त्यात हत्यात करण्यात आली होती. २८ वर्षीय सिद्धूच्या हत्येनंतर संपूर्ण देश सुन्न झाला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY : जेव्हा चुलत बहिनीने जितेंद्र यांच्यावर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप, ऐकून सगळ्यांनाच बसला होता आश्चर्याचा झटका

Jackie Chan Birthday: जॅकी चॅनचे बॉलिवूडशी खास नाते, ‘या’ चित्रपटांमध्ये भारतीय कलाकारांसोबत केले आहे काम

हे देखील वाचा