Tuesday, July 9, 2024

सिद्धूच्या पालकांनी संगीत निर्मात्यांना दिली कडक चेतावणी; म्हणाले, ‘जर मुलाचे गाणे…’

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) याची २९ जून रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही अशी घटना होती, ज्याने देशभरातील चाहत्यांनाच नव्हे, तर संपूर्ण इंडस्ट्रीला हादरवून सोडले. वयाच्या २८व्या वर्षी पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीने एक असा स्टार गमावला, जो त्याने गायलेल्या गाण्यांनी सर्वांची मने जिंकायचा.

त्याच्या निधनाने सर्वांवर शोककळा पसरली असताना, एकुलता एक मुलगा गमावलेल्या आई-वडिलांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यांची वेदना कोणाच्याही निराशेपेक्षा खूप मोठी आहे, ज्यातून बाहेर पडणे खूप कठीण आहे. या सगळ्यात गायकाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याच्या पालकांनी एक इशारा जारी केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. (sidhu moosewala parents requests not to release his unreleased songs)

संगीत निर्मात्यांना दिली चेतावणी
या दु:खाच्या भीषण अवस्थेतही असे काही लोक असतील, जे सिद्धूचे नाव जोडून नफा कमावण्याचा विचार करतील. अशा लोकांचा विचार करून गायकाच्या टीमने सिद्धूच्या आई-वडिलांच्या वतीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून इशारा दिला आहे. या इशाऱ्यात त्यांनी सिद्धूचा कोणताही रिलीझ न झालेला ट्रॅक शेअर करण्यास किंवा लीक करण्यास सक्त मनाई केली आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “आम्ही सिद्धूसोबत काम केलेल्या सर्व संगीत निर्मात्यांना विनंती करतो की, त्यांनी सिद्धूचा कोणताही पूर्ण किंवा अपूर्ण ट्रॅक कुठेही शेअर करणे/रिलीझ करणे टाळावे.”

आता सर्व जबाबदारी वडिलांवर
जारी केलेल्या चेतावणीमध्ये पुढे म्हटले आहे की, “सिद्धूचा कोणताही ट्रॅक लीक झाल्यास आम्ही त्याच्याशी संबंधित व्यक्तीवर कारवाई करू. ८ जून रोजी सिद्धूच्या भोगनंतर त्याच्याशी संबंधित सर्व कंटेट त्याच्या वडिलांकडे सोपवा. वडिलांशिवाय, सिद्धूचा कंटेट त्याच्या नातेवाईक आणि मित्रांना देऊ नये. सिद्धूचे वडील आता याबद्दल सर्व काही ठरवतील.”

अशा प्रकारे झाला सिद्धूचा खून
प्रसिद्ध पंजाबी गायक, रॅपर आणि काँग्रेस नेता सिद्धू मूसवाला याची रविवारी (२९ मे) संध्याकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हल्लेखोर तीन कारमधून आले होते. सिद्धू काही साथीदारांसह आपल्या थार कारमधून मानसाच्या जवाहरके गावातून खारा-बरनाळा गावात जात असताना ही हत्या करण्यात आली. खुनाच्या एक दिवस आधीच पंजाब सरकारने त्याची सुरक्षा काढून घेतली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा